Home क्राईम ब्लास्ट :- आता RTO अधिकाऱ्यासोबत तपासी पोलीस अधिकारी बागडेची पण तक्रार?

क्राईम ब्लास्ट :- आता RTO अधिकाऱ्यासोबत तपासी पोलीस अधिकारी बागडेची पण तक्रार?

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून गाडीच्या ट्रान्सफर प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल. पण RTO अधिकाऱ्यांना सूट देण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद?

RTO चा पंचनामा भाग :-13

चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्या बाबत तक्रारी चा जणू ओघ लागला असून जिल्ह्याबाहेरील अनेक RTO अधिकारी यांनी त्यांच्या न ऐकलेल्या कहाण्याच्या संदर्भासह घटना व्यक्त करून त्यांच्या कारनाम्याचे पठण केले आहें, स्थानिक अधिकारी ते मंत्रालय व आयुक्त यांच्यापर्यंत आणि स्थानिक राजकारणी ते मोठ्या पत्रकारापर्यंत जनतेकडून लुटलेल्या पैशाचा कसा वाटप होतो याचं नावासह विस्तृत वर्णन समोर आल्याने सर्वसामान्य वाहन धारक यांना संताप येईल एवढं हे संतापजनक ठरत आहें, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या भ्रष्ट परंपरेला छेद देतं मोरे आणि मेश्राम यांनी आपली स्वतःची अक्कल लावून कोट्यावधी च्या अवैध वसुलीचा इतिहास रचला आहें व स्वतःच्या संपत्तीत मोठी वाढ केली आहें, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे तर समोरील निवडनुका मध्ये आमदारकी सुद्धा लढविणार असल्याची माहिती असून आत्तापर्यंत त्यांनी किमान 100 कोटी पेक्षा जास्त माया जमा केली असल्याचे बोलल्या जातं आहें तर आंनद मेश्राम यांच्या वर्धेपासून तर चंद्रपूर येथील कार्यकाळात स्वतःच्या संपत्तीमध्ये कशी वाढ केली याचे दास्तावेज पण समोर येत आहें, दरम्यान आता मोरे आणि मेश्राम यांच्या स्थावर मालमत्तेची यादीच जाहीर व्हायची तेवढी बाकी आहें.

RTO कार्यालयात दलालामार्फत सगळीच कामे होतात आणि ज्यांनी हे काम स्वतः करतो म्हटलं तर RTO कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य वाहन धारक यांची कामे करत नाही, कारण दलाला मार्फत जी कामे होतात त्यात टिकमार्क असतें म्हणजे पैसे मिळाले याची खून असतें आणि तेंव्हाच ओके म्हणून ती फाईल पुढे सरकते, असाच एक प्रकार RTO कार्यालयात झाला असून मृत व्यक्तीला जिवंत दाखवून ज्या गाडीचे ट्रांसफर रजिस्ट्रेशन केले त्यात या कार्यालयातील अधिकारी आणि संबंधित टेबल वरील कर्मचारी दोषी असतांना त्यांना सोडून एका एजंटला आणि ती गाडी स्वतःच्या नावे करून घेणाऱ्या व्यक्तीरवर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नयन साखरे यांनीच अगोदर दि. ०४/०८/२०२२ ला मृत व्यक्तीला जिवंत दाखवून गाडी नोंदणीकृत्त केल्याबाबत रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये मृत्यूच्या दाखल्यांसह रितसर तकार केली होती. परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश मुळे व ए.पी.आय. धोबे यांनी पैसे घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले होतें. महत्वाची बाब म्हणजे त्या घटनेला दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्या नंतर सुद्धा न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली नाही, खरतर जेंव्हा RTO अधिकारी एखाद्याच्या विरोधात तक्रार करतात तेंव्हा पोलीस संबंधित व्यक्तीवर लगेच गुन्हे दाखल करतात तर मग एखाद्याची गाडी रजिस्ट्रेशन ची जबाबदारी RTO अधिकाऱ्यांची असतें तिथे एजंट आणि वाहन धारक यांचीच चूक कशी? ही चिंतनीय बाब आहें दरम्यान पोलिसांची ही जाणीवपूर्वक खेळी आहें हे स्पष्ट होते.

रामनगर पोलीस RTO अधिकाऱ्यावर गुन्हे का दाखल करत नाही?

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून टाटा जेनान ह्या मालवाहक गाडीचे ट्रांसफर रजिस्ट्रेशन च्या या प्रकरणात संबंधीत गाडी मालक मृत असल्याचा पुरावा सामाजिक कार्यकर्ते नयन साखरे यांनी रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये तक्रारी सह दाखल केला होता, त्याबाबत साखरे यांच्याकडे दास्तावेज सुद्धा आहें, पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेता उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी सांठगांठ करून तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश मुळे व ए.पी.आय. संदीप धोबे यांनी अधिकाऱ्यांना सोडून दलाल उराडे व गाडी घेणाऱ्या एकनाथ एकोनकर याचेवर गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात एजन्ट आणि गाडी विकत घेणाऱ्या दोघांनीही अटकपूर्व जामीन घेऊन आपली सुटका केली खरी पण आता भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे सुरु असलेला RTO चा पंचनामा ही मालिका सुरु आहें, त्यात या गुन्ह्याचा उल्लेख आल्याने जणू जुन्या कढीला नवा ऊत आणून त्याचा नव्याने तपास सुरु आहें, पण खरे आरोपी मोकाट असून केवळ एजंट ला गुन्हा कबूल कर असा दबाव टाकून RTO अधिकारी किरण मोरे व आनंद मेश्राम यांना यातून मुक्त करायचे तपाशी पोलीस अधिकारी बागडे यांचे प्रयत्न आहें हे आता स्पष्ट होतं आहें.

RTO अधिकारी मोरे आणि मेश्रामसह कर्मचारी यांच्यावर कसे होतील गुन्हे दाखल?

RTO कार्यालयात एखाद्या गाडीचे रजिस्ट्रेशन असो, ट्रांसफर असो की इतर कामे ती या कर्यालयातील तीन टेबल वरून फिरून मग फायनल होतात आणि मृत व्यक्तीला जिवंत दाखवून ज्या गाडीचे ट्रान्सफर रजिस्ट्रेशन झाले त्यात सुद्धा बाहेरील दलाल याने RTO च्या खास वसुली करणाऱ्या रवी नामक दलालाला 1200/- रुपये दिल्यानंतर त्या गाडीचे ट्रांसफर रजिस्ट्रेशन तीन टेबल वरून फाईल फिरून झाल्यानंतर झाले, दरम्यान या प्रकरणी उराडे नामक दलाल यांनी रामनगर पोलीस स्टेशनं येथे एपीआय बागडे यांना बयान दिले की मी ज्या RTO च्या रवी नामक वसुली करणाऱ्या दलालला 1200/- रुपये दिले त्यात किरण मोरे आंनद मेश्राम आणि संबंधित बाबू कर्मचारी यांचा वाटा आहें, कारण गाडी आणि गाडी मालक यांचं व्हेरीफिकेशन कारण्याचं काम हे त्यांचचं आहें, कारण रजिस्ट्रेशन चं व्हेरीफिकेशन चं काम तीन टेबल वरून होते त्यात दोन कर्मचारी आणि एक अधिकारी यांच्या स्वाक्षरीने केल्या जाते, मग ज्या RTO कर्मचारी अधिकारी यांच्याकडे व्हेरीफिकेशन काम आहें त्यांचा दोष नाही का? हे पोलीस अधिकाऱ्यांनी समजून घ्यायला हवे पण या प्रकरणात ए.पी.आय. बागडे यांनी गुन्हा नोंद असलेल्या आरोपी आशिष उराडे यांना अॅन्टीह सिपेटरी बेल असतांना सुध्दा दि. २३/०३/२०२५ ला घरून उचलून पोलीस स्टेशनंला आणले व त्याचे बयाण घेतले परंतु आरोपी याने तपासी अधिकाऱ्यांना सांगीतले की, मी दलाल असून संबंधीत कामाचे पैसे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी, आनंद मेश्राम व किरण मोरे यांना दिले तरी सुध्दा तपासी अधिकारी बागडे यांनी आरोपीच्या बयाणात संबंधित दोषी अधिका-याचे नावे नमुद केली नाही. त्यामुळे RTO अधिकारी किरण मोरे आणि आंनद मेश्राम यंच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे, पण रामनगर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने याबाबत नयन साखरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून आता या प्रकरणी तपाशी अधिकारी बागडे यांच्यावर पोलीस अधीक्षक काय कारवाई करेल हे लवकरच समोर येणार आहें.