Home महाराष्ट्र लक्षवेधक :- मुख्यमंत्री शिंदे आपल्या समर्थकांसह गुवाहाटीमध्ये का गेले? जाणून घ्या रहस्य.

लक्षवेधक :- मुख्यमंत्री शिंदे आपल्या समर्थकांसह गुवाहाटीमध्ये का गेले? जाणून घ्या रहस्य.

भारतात प्रशिद्ध गुवाहाटीच्या कामाख्या (kamakhya) मंदिरात काय होतात आश्चर्यकारक घटना?

लक्षवेधक :-

भारतात प्रशिद्ध असणाऱ्या आसाम या राज्यातील गुवाहाटीमध्ये (kamakhya mnadir ) कामाख्या मंदिरात दर्शनासाठी राजकीय पुढारी व इतर लोकं कां जातात? या प्रश्नांची उत्तरे फार आश्चर्यकारक आहे कारण इथे अशी आख्यायिका आहे की या मंदिरात आल्यानंतर आपल्यावर झालेली जादू व वशीकरण व इतर दोष उतरले जातात व या मंदिर परिसरात साधू लोकं असतात ज्यांना शिद्धि प्राप्त असते ते आपल्या शिद्धिच्या बळावर कोणत्याही लोकांवर झालेली काळी जादू व वशीकरण उतरवितात. एवढेच नव्हे तर या मंदिरात बोललेले नवस यशस्वी होतात व ते नंतर या मंदिरात बकरे किंव्हा रेडे यांची बळी देऊन ते नवस फेडले जातात.

गुहाहाटी च्या दौऱ्याला अनेक विरोधी नेत्यांकडून टिका होतं असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात नवस बोलले होते की देवी मला मुख्यमंत्री कर आणि त्या देवीचा चमत्कार झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हा समज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक मंत्री व आमदारांचा झाला असल्यानेच एकनाथ शिंदे हे गुहाहाटीला गेले अशीच शक्यता जास्त आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार (Shinde Faction MLA) आज कुटुंबासह गुवाहाटीमध्ये (Guwahati) दाखल होणार आहेत. गुवाहाटी येथील कामाख्या मातेच्या (Kamakhya Mata Mandir) मंदिरात हे आमदार जाणार असून तिथे पूजा करणार आहेत. विरोधकांकडून या दौऱ्यावर टीका करण्यात येत आहेत. गुवाहाटीमधील कामाख्या मंदिराला कोणाचा बळी देणार, असा उपरोधिक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर शिंदे गटाने याला प्रत्त्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर भाष्य करताना आम्ही बळी देणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या विकासविरोधी विचारांचा बळी देणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आशिर्वाद मागण्यासाठी जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोणाचा बळी देणार असा प्रश्न केला होता. महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी घ्यावा असे कामाख्या देवीला साकडं घालणार आहोत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. राज्यावरील संकटे दूर करावीत, नैसर्गिक आपत्ती, वादळे, महासाथीच्या आजारासारखे अरिष्ट दूर करावे, या अरिष्टांचा बळी घ्यावा, अशी प्रार्थना करणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. राज्यातील जनतेला सुखी करावे, राज्याचा विकास व्हावा यासाठी देवीला साकडं घालणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

पाच महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर शिंदे गट (Shivsena Shinde Faction) हा सूरत मार्गे गुवाहाटीत (Guwahati)दाखल झाला होता. त्यानंतर आज शिंदे गट पुन्हा एकदा कुटुंबासह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे. मात्र, या दौऱ्यातून काही मंत्री, आमदार, खासदार अनुपस्थित आहेत. त्यापैकी काहींनी वैयक्तिक कारणांमुळे गुवाहाटीला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

का जातं नाही इतर मंत्री आणि आमदार गुहाहाटीला ?

शिंदे गटाच्या बंडात आधीपासून सहभागी असणारे अब्दुल सत्तार यांनी दौऱ्याकड पाठ फिरवली. आधीच निश्चित असलेल्या कार्यक्रमांमुळे आपण गुवाहाटीला गेलो नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. आपण सरकारवर नाराज नाही, असेही त्यांनी म्हटले. तर, राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवली. देसाई यांच्या घरातील एक लग्नकार्य असल्याने त्यांनी गुवाहाटीला जाणे टाळले असल्याचे म्हटले जात आहे. तर, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देखील आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे गुवाहाटीला जाणे टाळले असल्याचे म्हटले जात आहे. परांडा येथे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबीर असल्याने ते देखील गुवाहाटीला गेले नाहीत.त्याशिवाय, मंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. दूध संघ निवडणूक माघारीची तारीख असल्याने यावेळी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. आमदार शिंदे हे सातारा कोरेगावमध्ये असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मुक्ताई नगर येथील आमदार चंद्रकांत पाटील हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. कुटुंबात लग्नकार्य असल्याने आणि प्रकृतीही बरी नसल्याने आपण गुवाहाटी दौऱ्यात गेलो नसल्याचे कारण आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सांगलीतील खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी गुवाहाटी दौरा रद्द केला आहे. कौटुंबिक कारणामुळे आमदार बाबर हे गुवाहाटीला जाणार नाहीत. आपल्याला मंत्रिपद मिळाले नसल्याने कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चार महिन्यापूर्वी त्यांची पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले होते. शोभा बाबर यांची जयंती असल्याने त्यांनी गुवाहाटीऐवजी घरी थांबण्यास प्राधान्य दिले आहे. शिंदे गटास सामिल झालेले कोल्हापूरमधील दोन्ही खासदारदेखील गुवाहाटीला गेले नाहीत. संजय मंडलीक आणि धैर्यशील माने हेदेखील या दौऱ्यासाठी अनुपस्थित आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत.

Previous articleएकोना (wcl) कोळसा खदान प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांची भूमिका काय ?
Next articleवनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्यावर कारवाईसाठी वनपाल संघटना आक्रमक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here