Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वनक्षेत्रात अवघ्या दोन दिवसात सहा वाघांचा (tigers...

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वनक्षेत्रात अवघ्या दोन दिवसात सहा वाघांचा (tigers death) मृत्यू?

जंगलातील वाघांचा संघर्ष की आणखी कुठलं कारण वाघांच्या मृत्यूस कारणीभूत यांची चौकशी गरजेची.

चंद्रपूर प्रतिनिधी :

मागील अवघ्या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात 6 वाघांच्या मृत्यूची (tigers death) नोंद झाली झाल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.जंगलातील वाघांचा संघर्ष की आणखी कुठलं कारण वाघांच्या मृत्यूस कारणीभूत यांची चौकशी करण्यासाठी वनविभाग पुढे येईल का ? हा प्रश्न या निमित्यानेसमोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच ताडोबाच्या बफर क्षेत्रातील आगरझरी येथे एक बछडा आणि शिवनी क्षेत्रात वाघीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या हिरडी नाला परिसरात वाघांची 4 मृत पिल्लं आढळल्याची घटना घडली आहे. या चारही मृत पिल्लांचं वय अंदाजे 3 ते 4 महिने आहे. मृत पिलांच्या अंगावर जखमा असल्याने परिसरात असलेल्या अन्य एखाद्या मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..

सन 2012 मधे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघाला निर्दयीपणे ठार करण्यात आले होते व दरम्यानच्या काळात वाघांच्या शिकारी होतं होत्या त्यामुळे त्यांवर वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाघांच्या शिकारीवर प्रतिबंध लावला मात्र त्यानंतर वाघांच्या संखेत झपाट्यानं वाढ झाली आणि त्यांचे स्वतःचे क्षेत्र बनविण्याच्या नादात व संघर्षामुळे काही वाघांना जंगल सोडून गाववस्त्यांकडे धाव घ्यावी लागली व त्यामुळं त्यांच्या या वावरामुळे अनेक गावखेड्यातील लोकांना व जनावरांना त्यांनी लक्ष करून ठार केले. या संदर्भात वनविभागाचे कुठलेहीठोस धोरण अजूनपर्यंतकार्यान्वीत नसून वाघांचा मानवी संघर्ष कुठपर्यंत चालेल ? यांचे उत्तर मिळत नाही.

दरम्यान जंगलातील वाघांच्या शिकारी थांबल्या पण वाघांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येत नाही आणि दिवसेंदिवस वाघांच्या मृत्यूच्या  बातमीत वाढ होताना दिसत असल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी वन्यप्रेमी यांची मागणी आहे.

Previous articleअखेर भ्रष्ट व मुजोर वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड निलंबित.
Next articleभद्रावती शहरात मनसेच्या पक्ष बांधणीला सुरुवात, युगल ठेंगे नवे शहर अध्यक्ष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here