Home वरोरा अखेर त्या विनयभंग करणाऱ्या चतुर शिक्षकांवर विनयभंग व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

अखेर त्या विनयभंग करणाऱ्या चतुर शिक्षकांवर विनयभंग व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

शिक्षकाच्या उलट्या चालीने मुलीच्या वडिलांसह इतरांवर खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी केला होता गुन्हा दाखल.

भूमिपूत्राची हाकच्या त्या बातमी नंतर मुलीने केली पोलीस स्टेशन मधे तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

जिथे नीतिमूल्ये शिकवली जातात त्या शिक्षण क्षेत्रात जर शिक्षकच नितिमुल्याचे अधःपतन करत असेल व आपली वक्रदृष्टी आपल्या विद्यार्थिनीवर टाकत असेल तर ती शाळा आणि त्या शाळेची किर्ती काय असेल हे न ऐककेलचं बरं, वरोरा तालुक्यातील एका गावांत एक शाळा अशा एका वाईट कृत्यांनी गाजत आहे जिथे एका चतुर शिक्षकाने आपल्याच शाळेतील मुलीच्या वासनिक हेतूने छातीवर हात लावल्याने एकच खळबळ उडाली होती, परंतु हे प्रकरण बाहेर जाऊ नये कारण त्यामुळं शाळेची बदनामी होईल अशी त्या शाळेतील मुख्याध्यापक यांची अपेक्षां होती मात्र आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने त्या चतुर शिक्षकांनी वेगळीच शकलं लढवली व मुलीच्या वडीलाला पैसे देऊन हे प्रकरण थांबवण्याच्या नावाखाली त्या बिचाऱ्या मुलीच्या वडीलाला खंडणीच्या गुन्ह्याखाली अटकवले.

दरम्यान भूमिपूत्राची हाक या न्यूज पोर्टलवर या संदर्भात बातमी प्रकाशित होऊन त्या नराधम चतुर शिक्षकांवर कारवाई का नाही हा प्रश्न उपस्थित करून मुलीच्या आई वडील यांनी पोलिसांत का तक्रार केली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळं सदर घटनाक्रम लक्षात घेता काही सामाजिक व्यक्तींनी त्या मुलींच्या आईला धीर देऊन त्या नराधम चतुर शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सहकार्य केल्याने आईने मुलीला सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले तेंव्हा कुठे चतुर शिक्षकांवर विनयभंग व पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

ज्या शिक्षकाकडून आदर्श घेऊन समोरची पिढी घडते तो शिक्षकच जर विद्यार्थीनीचा विनयभंग करत असेल तर मग अशा शिक्षकांचे करायचे काय ? हा प्रश्न समाजमनाला सुन्न करणारा आहे. त्यामुळे अशा शिक्षकांचे त्वरित निलंबन करून शाळा संचालकांनी त्या शिक्षकाला धडा शिकवावा अशी मागणी होतं आहे.

Previous articleआता सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे विक्रीपत्र रद्द होणार?
Next articleशैक्षणिक :- चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थांसाठी गणितज्ञ ‘सुपर 30’चे आनंद कुमार यांचे व्याख्यान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here