Home चंद्रपूर शैक्षणिक :- चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थांसाठी गणितज्ञ ‘सुपर 30’चे आनंद कुमार यांचे व्याख्यान.

शैक्षणिक :- चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थांसाठी गणितज्ञ ‘सुपर 30’चे आनंद कुमार यांचे व्याख्यान.

आयआयटी व करिअर संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कोण आहेत आनंद कुमार ? जाणून घ्या..

चंद्रपूर प्रतिनिधी :-

शिक्षण क्षेत्रात एवढी मोठी स्पर्धा आहे की आता विद्यार्थ्याना नवनवे क्षितिजे गाठण्याचे नवे आव्हान उभे राहत आहे, दरम्यान या आव्हानाला पेलण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात व चंद्रपूर जिल्ह्यात असून जेईई/नीट या स्पर्धा परीक्षेत चंद्रपुरात उत्कृष्ट निकाल देणारी शिक्षण संस्था ‘इन्स्पायर ‘विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने नेहमीच काही ना काही कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षीही इन्स्पायर तर्फे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून जिद्दीने यशाची शिखर गाठणारे सुप्रसिद्ध गणितज्ञ *Super 30* पटना चे आनंद कुमार यांना येत्या 15 जानेवारी 2023 रविवार ला, चंद्रपूर येथील नागपूर मार्गावरील विद्यानिकेतन शाळेच्या समोरील शकुंतला फार्म्स मध्ये सायंकाळी 5 वाजता आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात 7000 विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याना आता आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार असून इन्स्पायर तर्फे जिल्ह्यातील विविध शाळेतील 540 विद्यार्थ्यांची ‘इन्स्पायर शाईन आऊट ‘या नावाने दिनांक 8 जानेवारी 2023 ला प्रवेश परीक्षा घेतली होती व या परीक्षेत पहिल्या 30 आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी आनंद कुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

*कोण आहेत आनंदकुमार?*

बिहार राज्यातील पटना येथे आनंदकुमार यांनी 2002 मध्ये गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांसाठी सुपर 30 नावाचे कोचिंग क्लासेस सुरू करून 2002 ते 2022 या कालावधीत त्यांनी 600 विद्यार्थ्यांना आयआयटी सारख्या जगातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळवून दिला. या 30 विद्यार्थ्यांचे संपूर्ण जेवण, राहणे व प्रशिक्षणाचा खर्च ते स्वतः करतात या त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे त्यांना जगभर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. Discovery,BBC या चित्रवाहिनींवर तसंच प्रसार माध्यमात देखील आनंदकुमार यांची दखल घेतली आहे. MIT आणि Harvard सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांची खूप प्रशंसा केली आहे आणि त्यांना अमेरिकेतील या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. 2019 मध्ये प्रदर्शित चित्रपट *सुपर 30*. यात अभिनेता रितिक रोशन ने आनंदकुमार यांची भूमिका निभावली होती. आनंदकुमार यांना एशियातला उत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आलं तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या ऑफिसने देखील आनंदकुमार यांना जगातला उत्कृष्ट शिक्षक म्हणून संबोधले गेले.

*7000 विद्यार्थ्याना होणार मार्गदर्शन*

चंद्रपूर जिल्ह्यात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्णसंधी आहे कारण या कार्यक्रमात आनंद कुमार आयआयटी परीक्षेत यशस्वी कसे व्हायचे याविषयी विद्यार्थ्यांना संबोधणार आहेत. तसंच या कार्यक्रमात 7000 हजार विद्यार्थी आणि पालक तसेच जिल्ह्यातील गणमान्य लोकांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी प्रवेश पास निशुल्क आहे . हे प्रवेश पास आकाशवाणी रोडवरील इन्स्पायर ऑफिस मध्ये उपलब्ध असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन इन्स्पायर चे संचालक विजय बद्खल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here