Home वरोरा खळबळजनक :- करंजी-तुराना रेती घाट शिवारात आढळला लाखों रुपयांचा रेती स्टॉक ?

खळबळजनक :- करंजी-तुराना रेती घाट शिवारात आढळला लाखों रुपयांचा रेती स्टॉक ?

करंजी-तुराना-वरोरा रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्या जड वाहतुकीवर प्रशासन प्रतिबन्द लावणार का ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा भद्रावती तालुक्यात रेती घाट लिलाव झाले असले तरी बेकायदेशीर रेती घाटात जेसीबी व पोकल्यान मशीन लावून रेती उपसा सुरू आहे. दरम्यान करंजी तुराना रेती घाटांवर धाड टाकून उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांनी रेती घाटातून जेसीबी मशीन सह हायवा ट्रक व इतर मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली होती पण आता त्याच घाटाच्या परिसरात मोठा रेती साठा आढळल्याने आता तो रेती स्टॉक कुणाचा ? व तो जप्त होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

या रेती घाटातील जड वाहने मोठ्या प्रमाणात करंजी तुराना ते वरोरा रस्त्यांची दुर्दशा करत आहे कारण इथे मोठे खड्डे पडून दुचाकी स्वाराला जाणे येणे मुश्किल झाले आहे शिवाय शाळेकरी वाहनाला या ठिकाणी गाड्या चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील सरपंच यांनी यावर प्रतिबंध लावावा अशी मागणी केली आहे. आता या परिसरात शेतीच्या जागेवर जवळपास 100 ते 150 ट्रॅक्टर्स रेतीचा स्टॉक पडून असून या संदर्भात माहिती काढली असता या रेती स्टॉक ला परवानगी नसल्याचे कळते त्यामुळे आता या रेती स्टॉकची जप्ती होईल का ?असा प्रश्न या परिसरातील जनता करत असल्याने प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleकर्जमाफीपासून वंचित शेतकरी करणार वरोरा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
Next articleसामाजिक सुरक्षेतेसाठी का हवा कॅमेऱ्याचा तिसरा डोळा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here