Home वरोरा सामाजिक सुरक्षेतेसाठी का हवा कॅमेऱ्याचा तिसरा डोळा ?

सामाजिक सुरक्षेतेसाठी का हवा कॅमेऱ्याचा तिसरा डोळा ?

जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही यंत्रणा अद्यावत करण्याचे पोलिसांसमोर आव्हानं.

प्रतिनिधी खाबांडा
मनोहर खिरटकर(15 जानेवारी)

जिल्ह्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना व जिल्ह्याचा सामाजिक व ऐतिहासिक इतिहास लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीने पोलीस प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलने आवश्यक आहे, कारण बाहेर जिल्ह्यातील व प्रांतातील वाहने जिल्ह्यात येतात त्यांवर करडी नजर असणे आता आवश्यक झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात जागोजागी होतं असलेल्या चोऱ्या व अवैध व्यवसाय यामुळे गुंडागर्दी होतं आहे व यामुळं सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास होतं आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनानं अद्यावत यंत्रणेचा वापर करून चोरट्यांचा व अवैध व्यवसाय याचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख हायवे च्या चौकात व शहरातील प्रत्तेक चौकात सीसीटीवी कैमेरे लावणे आता गरजेचे झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात ऐतीहासीक मंदिराच्या ठिकाणी होणारी गर्दी व पर्यटकांच्या सोयीसुविधांकरिता शहर व परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी जी यंत्रणा असते त्या यंत्रणेला अद्यावत करून तिथे सीसीटीव्ही यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षेतात कायम राखण्यास मदत होईल. मात्र या संदर्भात पोलीस प्रशासन कमकुवत ठरल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीच्या घटना वाढत असतांना आता तरी सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावण्याची मागणी नागरिकांतून केली जातं आहे सद्यस्थितीमध्ये चंद्रपुर जिल्ह्यात काही ठिकाणि गावामध्येच पोलीस प्रशासनामार्फत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पुर्वी दारूबंदिच्या काडात तथा कोरोनाकाडात जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर चौकामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती पंरतु आता या पोलीस चौक्या बंद झाल्या आणि त्यामुळेचं चोरी व अवैध धंदे वाढले आणि दादागिरीचे प्रमाणात वाढ झाल्याचा प्रत्यय खाबांडा येथील प्रवेशद्वारवर दिसुन येत आहे. .

गेल्या काही दिवसात खाबांडा येथील झालेली चोरीची घटना घडली पण सिसिटिव्हि यंत्रणेचा अभाव असल्याने चोरट्याचा थांगपत्ता आजपर्यत लागला नाही याच ठिकाणी सट्टाबाजार,व देशीदारू खुलेआम विक्री होताना दिसते आहे.दरम्यान सध्या सुरू असलेल्य थंडीचा मोसम हा या चोर कंपनीसाठी फायद्याच असतो हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला यया संदर्भात आवश्यक असणारी सीसीटीव्ही यंत्रणा खांबाडा प्रवेश द्वाराजवळ उभी करण्याची मागणी नागरिकांकडून होतं आहे.

Previous articleखळबळजनक :- करंजी-तुराना रेती घाट शिवारात आढळला लाखों रुपयांचा रेती स्टॉक ?
Next articleखळबळजनक:- नकली नोटांचा बाजार पुन्हा जोरात ? काय आहे सत्य ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here