Home चंद्रपूर खळबळजनक:- नकली नोटांचा बाजार पुन्हा जोरात ? काय आहे सत्य ?

खळबळजनक:- नकली नोटांचा बाजार पुन्हा जोरात ? काय आहे सत्य ?

राजुरा येथे नकली नोटांचा सौदा करणारे पोलिसांच्या जाळ्यात. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

राजुरा प्रतिनिधी :-

जिल्ह्यात परत नकली नोटांचा बाजार आता जोमात आहे की काय ? अशी स्थिती निर्माण झाली असून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने चाळीस हजार रुपयाच्या मोबदल्यात पाच लाखांच्या नकली नोटा विक्री करणाऱ्या दोघांना राजुरा ते आसिफाबाद रोडवरील रेल्वे पटरी जवळ सापळा रचुन जेरबंद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ला माहिती मिळाली कि आसिफाबाद (तेलंगाना) येथील निखील भोजेकर नामक इसम हा भरपुर लोकांना चलनातील नोटांचे बनावट नोटा (fake currency) कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवुन त्यांना खेळण्या मधील नोटा देवुन लोकांची फसवणुक करीत असल्याची माहिती खबरीच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली दरम्यान 40 हजार रू. च्या बदल्यात 5 लाख रू. च्या बनावट नोटा देण्याचे त्यांनी आमिष दाखवले व सदर इसम बनावट नोटा देण्याकरीता राजुरा येथे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थागुशा येथील सपोनि मंगेश भोयर यांचे सोबत स्थागुशा येथील अंमलदारांचे पथक तयार करून मिळालेल्या माहीतीची खातरजमा करून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश मिळताच सपोनि मंगेश भोयर व त्यांचे पथकाने राजुरा ते आसिफाबाद रोडवरील रेल्वे पटरी जवळ सापळा रचुन बनावट नोटा देण्याकरीता आलेल्या दोन आरोपी नामे निखील हनुमान भोजेकर, वय 24 वर्षे रा. चनाखा ता. वणी जि. यवतमाळ व सैफुद्दीन जलाउद्दीन सैयद, वय 22 वर्षे रा. सिंधोला ता. वणी जि. यवतमाळ यांना खबरीस नोटा देत असतांना त्यांचे ताब्यातुन 500 रू. नोटाच्या आकाराचे हुबेहुब 500 रू. नोटा प्रमाणे दिसणारे हिरव्या रंगाच्या “भारतीय बच्चो का बॅक, 500 रू.” असे छापीव 4408 कागदांचे तिन बंडल मिळुन आले, सदर छापीव कागदांबाबत संशय येवु नये म्हणुन प्रत्येक बंडल चे पुढे व मागे चलनातील दोन 500 रू. च्या नोटा अशा एकुण 06 नोटा किंमत 3000 /- रू., दोन मोबाईल हॅन्डसेट किंमत 75,000/- रू. इंडिका वाहन क्रमांक एमएच 46 डब्लु 7545 असा एकुण 10,78,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींविरूध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे अप. क. 19 / 2023 कलम 420, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत करीत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, अंमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहुले, चालक प्रमोद डंभारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here