Home वरोरा फ्लाय ऐशचा हायवा सुपर मार्केट मधे घुसला तो हायवा कुणाचा ? .

फ्लाय ऐशचा हायवा सुपर मार्केट मधे घुसला तो हायवा कुणाचा ? .

जयकुमार सिंह यांचा ठेका असणाऱ्या हायवाची सुपर मार्केट मधे कशी बसली धडक ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील फ्लाय ऐश विकण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात विस्तारला असून ज्या फ्लाय ऐश ला डिस्पोजेबल करायचे आहे ती फ्लाय ऐश खुलेआम गरजू लोकांना विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून आज सायंकाळी वरोरा येथील नागपूर चंद्रपूर रोडवरील सुपर मार्केट मधे फ्लाय ऐश भरलेल्या ट्रक ने धडक दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा ट्रक कुणाचा आहे हे पोलीस तपासात समोर येईल मात्र फ्लाय ऐश जयकुमार सिंह हया कंत्राटदार यांच्या कंत्राट असलेल्या कंपनीतून बाहेर आल्याची चर्चा असल्याने फ्लाय ऐश जयकुमार सिंह हे बेकायदेशीर विकत असल्याची बाब समोर आली आहे.

हा हायवा ट्रक सुपर मार्केट मधे घुसला तो कुणाचा आहे हे समोर येइलच पण  फ्लायऐश चे ट्रक खुल्या मार्केट मधे बेकायदेशीर कसे विकल्या जातात व यामागे कोण आहेत हे पोलिसांनी तपासून त्या जयकुमार सिंह कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here