Home वरोरा आरोग्यवार्ता ;- शेवगाची पाने व शेंगा कर्करोग,मधुमेह,थायरॉईड, हृदयरोग व त्वचा रोगासाठी रामबाण...

आरोग्यवार्ता ;- शेवगाची पाने व शेंगा कर्करोग,मधुमेह,थायरॉईड, हृदयरोग व त्वचा रोगासाठी रामबाण इलाज.

शेवगा झाडांच्या पानांचा पावडर व शेवगा शेंगाच्या भाजी सेवनाचे फायदे बघून व्हाल आश्चर्यचकित.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील मजरा या गावाशेजारी एका शेतात मनसे जिल्हा उपाध्यक्ष तथा साप्ताहिक भूमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांनी जवळपास ३ एकर शेतात शेवगा लागवड केली असून ती झाडे आता फुलावर येऊन शेंगा येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान ३ एकर मधील शेवग्याचा प्लाट बघून काही शेतकरी आपण सुद्धा शेवगा लावणार असे म्हणत आहे तर काही शेतकरी हया शेंगा विकायच्या कुठे ? याबद्दल गोंधळात आहे. पण शेवग्याच्या शेंगांचे व पानांचे जे आरोग्याच्या द्रुष्टीने फायदे आहेत त्यामुळे या शेवग्याला मोठी बाजारपेठ तयार आहे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवी.

शेवग्याची शेंग आपण सांबर किंवा डाळीत घालून खातो. शेवग्याच्या शेंगेनं जेवणाला एक वेगळीच चव येते. काही लोकांना शेवग्याची शेंग खाणं आवडत नाही. तर हेच लोक जेवणातही शेवग्याची शेंग घालत नाहीत. मात्र, तुम्हाला माहितीये का? शेवग्याची शेंगमध्ये सगळ्यात जास्त औषधी गुणधर्म आहेत. फक्त शेवग्याच्या शेंगा नाहीत तर त्याच्या पानांची भाजी देखील बनवण्यात येते. शेवग्याच्या शेंगेत विटामिन सी, विटामिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयरन मोठ्या प्रमाणात असतात.

काय आहे शेवग्याची शेंग खाण्याचे फायदे…? ( Benefits of Drumstick )

आजच्या धकाधकीच्या जिवनात उच्च रक्तदाबचे खूप जास्त रुग्ण आढळतात. याचे कारण आपलं बदललेलं जीवन आणि आहार आहे. यासोबत कोणत्याही गोष्टीवर खूप जास्त विचार केल्यामुळे देखील ही समस्या होते. मग आता शेवग्याच्या शेंगचे सेवन केले तर आपल्याला यातून सुटका मिळू शकते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शेवग्याच्या शेंग सगळ्यात फायदेशीर ठरू शकते. यात असलेले मॅग्नेशियम रक्तवाहिन्या निरोगी बनवण्याचे काम करते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब वाढत नाही.

काय आहे शेवग्याचे त्वचेसाठी फायदे ?(Drumstick for Skin)

शेवग्याची शेंग खाल्यानं त्वचेला अनेक फायदे होतात. कारण शेवग्याच्या शेंगेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अ‍ॅसिड सारखे पोषक घटक आढळतात ज्यामुळे त्वेचा ग्लोइंग दिसते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. शेवग्याच्या शेंगचे सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे इच्छा नसली तरी देखील शेवग्याची शेंगचा तुमच्या आहारात समावेश करा.

शेवग्याच्या सेवनाने शरीरावर येणाऱ्या सूजेपासून सुटका (Drumstick for Swelling)

वैद्यकीय एक्सपर्ट म्हणतात की शेवग्याच्या शेंगमध्ये एण्टी इन्फ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. शेवग्याची शेंग खाल्ल्यानं अंग दुखी आणि सूज येण्याची समस्या दूर होते. जो अवयव दुखत असेल तेथे शेवग्याच्या शेंगची पाने लावल्यानं सूज आणि दुखणे देखील जाते.

शेवगा हृदयासाठी फायदेशीर (Drumstick for Heart)

शेवग्याच्या शेंगमध्ये आढळणारे पोषक घटकांमुळे हृदयाला अनेक फायदे होता. शेवग्याच्या शेंगच्या झाडाच्या पानामध्ये बायोएक्टिव्ह संयुगेचे गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर राहतो.

शेवगा थायरॉईड नियंत्रित करणार (Drumstick for Thyroid)

ज्या लोकांना थायरॉईड आहे त्यांनी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगचा समावेश केला पाहिजे. असे केल्यानं थायरॉईड हार्मोन्स हे नियंत्रणात येतात.

Previous articleलक्षवेधी :- प्रजेची सत्ता की प्रजेवर सत्ता? गणराज्य की ‘गण-ना-राज्य’?
Next articleधक्कादायक :- शिक्षक, कर्मचारी सहकारी पत संस्थेत भ्रष्टाचाराचा पैसा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here