Home चंद्रपूर सनसनिखेज:-:घुग्गुस पोलीस स्टेशनमधे असली आरोपीला सोडून नकली आरोपीवर गुन्हा दाखल.

सनसनिखेज:-:घुग्गुस पोलीस स्टेशनमधे असली आरोपीला सोडून नकली आरोपीवर गुन्हा दाखल.

इंजिनिअर हसन सिद्दीकी या तरुण युवकाच्या अपघाताचा मामला रफादफा करण्याच्या ठाणेदार व तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रकरण चिघळलं.

घुग्गुस प्रतिनिधी:-

नवनियुक्त ठाणेदार अशिफ़ रझा रुजू झाल्यापासून घुग्गुस या औधोगीक शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना उधान आले असून कोळसा चोरी. सट्टापट्टी, दारू तस्करी, रेती तस्करी व चरस गांजा यांची खुलेआम विक्री या अवैध व्यवसायाला बळ मिळाले आहे. दरम्यान एका हसन सिद्दीकी नामक इंजिनिअर युवकाचा ज्या गाडीने अपघात झाला त्या गाडीचा ड्राइवर सोडून दुसऱ्या एकाला आरोपी बनविण्यात आल्याने व त्याचे मेडिकल न करता परस्पर केवळ सूचनांपत्र देऊन सोडून दिल्याचा सनसनिखेज मामला समोर आला आहे, त्यामुळं घुग्गुस पोलिसांविरोधात जनतेत मोठा रोष निर्माण झाला असल्याने या प्रकरणाची दखल घेऊन जर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी केली तर ठाणेदार अशिफ़ रझा यांच्यासह तपास अधिकारी आमटे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असे बोलल्या जातं आहे.

घुग्गुस शहर हे औधोगिक शहर व मिनी भारत म्हणून ओळखलं जातं कारण इथे भारतातील जवळपास सर्वच राज्यातील लोकं इथे कामधंद्यासाठी आलेले आहेत व इथलेच रहिवासी झालेले आहे. या शहराच्या आजुबाजुला वेकोलि खदान, लॉयड मेटल कंपनी,एसीसी सिमेंट कंपनी व कोल वॉशरिज असल्याने इथे अवैध धंदेवाईक मोठ्या प्रमाणांत धंदे करतात व त्यामुळे येथील सामाजिक वातावरण बिघडत असते पण हे सामाजिक वातावरण स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या वर अवलंबून असते, दरम्यान काही ठाणेदार वगळता येथे आलेले ठाणेदार यांनी याबाबात विशेष काळजी घेतली पण जेव्हापासून अशिफ़ रझा रुजू झाले तेव्हापासून सर्व अवैध धंदेवाईक यांना मोकळीक मिळाल्याची चर्चा असून जनतेत यामुळे पोलिसांप्रती रोष निर्माण झाला आहे, त्यातच आठ दिवसांपूर्वी एका हसन सिद्दीकी नामक इंजिनिअर युवकाच्या अपघात प्रकरणात पोलिसांनी असली आरोपी ला सोडून भलत्याच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला व त्याचे मेडिकल न करता त्याला सुचनपत्र देऊन सोडले असल्याने नेमका आरोपी कोणता ? आरोपी ने जेंव्हा युवकाला धडक दिली तेंव्हा आरोपी दारू पिऊन होता का ? पोलिसांनी कुठल्या आधारावर आरोपी तोच आहे असे समजून त्याला सूचनापत्र दिले? पोलिसांनी आठ दिवसांपासून सीसीटीव्ही कैमेरे का तपासले नाही ? पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने पोलिसांनी एवढी दिरंगाई कुठल्या कारणाने केली व मग न्यायालयात कुठल्या आधारावर पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार? असे एक नव्हे अनेक प्रश्न या दुर्घटनेच्या निमित्याने विचार करायला लावणारे असल्याने या प्रकरणी घुग्गुस शहरात मोठा असंतोष धगधगत आहे , दरम्यान  या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ठाणेदार अशिफ़ रझा व चौकशी अधिकारी आमटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

एकुलता एक मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ.

घुग्गुस येथील हसन सिद्दीकी हा इंजिनिअर म्हणून नुकताच एका खाजगी कंपनीत काम करत होता, तो घरच्यांना एकुलता एक असल्याने त्याला घरच्यांनीमोठ्या प्रेमाने वाढवलं व त्याचे शिक्षण केले.अतिशय मनमिळाऊ व सर्व मित्रांना हवाहवासावाटणारा हसन समाजात एक आदर्श युवक म्हणून परिचित होता, मात्र ड्राइवर च्या गलतिने त्यांच्यावर  काळाने झडप घेतली आणि त्यांनी अखेरचा निरोप घेतला.त्याच्या आकस्मिक जाण्यानेघुग्गुस शहरातील समाजमन हळहळ व्यक्त करत असून त्यांच्या अंत्यविधला मोठा जनसागर लोटला होता.

सभाष नगर येथील नुने यांचे आरोह प्लांट बेकायदेशीर ?

ज्या ट्राली डग्ग्यात पाण्याच्या क्यैन होत्या त्या पाण्याचा सुभाष नगर येथील आरोह बेकायदेशीर असून वेकोलिच्या जागेवर त्यांना कुणी परवानगी दिली ? हा प्रश्न उपस्थित होतं आहे. या संदर्भात सुद्धा पोलिसांनी चौकशी करून त्या ट्राली डग्ग्यात नेमकं कोण ड्राइविंग करत होता याचा तपास करणे आवश्यक आहे. मात्र आठ दिवस उलटून सुद्धा पोलिसांनी कुठलाही तपास केला नसल्याने हे प्रकरण रफादफा करण्याचा पोलिसांचा मनसुबा दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी घुगूस शहरातील जनता पोलिसांच्या या भूमिकेवर आक्रोश व्यक्त करत असून असली आरोपी ला लपवल्या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे.

Previous articleहनुमान नगर येथे नविन गुरुदेव सेवा मंडळ स्थापन. सुभाष कासनगोट्टीवार
Next articleमनपाच्या ४० कामांचे एकाच दिवशी मूल्यमापन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here