Home चंद्रपूर ‘जुनो’ ला घरामध्ये आणण्यासाठी पालिकेची परवानगी कशाला हवी?

‘जुनो’ ला घरामध्ये आणण्यासाठी पालिकेची परवानगी कशाला हवी?

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  आता प्रत्येक घरोघरी कुत्रा पाळणे ही फैशनच झाल्याचे दिसून येते. परंतु कुत्रा घरी आणताना त्याबाबत मनपाकडून परवानगी घेऊन नोंद करत परवाना घेणे गरजेचे असते. अन्यथा मनपा अधिनियम १९४९ नुसार दंड आकारण्याची किंवा कुत्रा जप्त करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात अद्यापही अशी कारवाई झाली नसल्याचे दिसून येते.

मागील काही वर्षात शहरासह ग्रामीण भागातही श्वान पाळणान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहाटेच्या वेळी आणि सायंकाळी अनेकजण रस्त्याने श्वानाला फिरविताना दिसून येतात. परंतु आपण पाळतोय त्या श्वानाची नोंद मनपाकडे करण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांना तर परवानगी घ्यावी लागते याबाबत कल्पनाच नाही.

घरात कुत्रा आणण्यापूर्वी पालिकेची परवानगी आवश्यक

परवानगीसाठी काय लागते? शहरी भागात कोणत्याही नागरिकास घरात कुत्रा पाळायचा असेल तर पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. पालिकेची परवानगी घेतली नसेल तर संबंधित श्वान मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई होऊ शकते.

शहरवासीयांना घरात श्वान पाळायचा असेल तर पालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु, चंद्रपूर नगरपालिकेकडे श्वान पाळण्यासंदर्भात कुणीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या कार्यालयात तशी नोदही नाही.श्वान खरेदी केल्यानंतर त्याला रेबीजचे किती डोस दिले याचे प्रमाणपत्र, पाच बाय सात आकाराची दोन छायाचित्रे, ७५० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येते. दरवर्षी नूतनीकरणासाठी ७०० रुपये, विलंब झाल्यास ७५० रुपये आकारण्यात येतात.एखाद्या नागरिकाकडे श्वान पाळण्याचा परवाना नसेल तर ७५० रुपये दंड आकारण्यात येत असतो. एखाद्या वसाहतीत तक्रार आल्यास मनपातर्फे कारवाई करण्यात येत असते.

लवकरच अॅप सुरु करणार श्वान घरी आणण्यापूर्वी त्याची मनपात नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच अॅप सुरु करण्यात येणार आहे. श्वान मालकानी आपल्या श्वानाची नोंदणी करून घ्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here