अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- मा.पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश रेल्वे अधिकार्यानी माहाकाली कॉलरी मधील 300,ते 350 घरे पाडण्याचा आदेश दिला होता त्या वेळी येथील रहिवासी मा. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि मा.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला तुमच्या घरांचा मोबदला किव्हा पुनवर्सन केल्या शिवाय तुमच्याघरांना धक्का पण लागू देणार नाही आणि या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी येथील माझी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टीवार यांना जीमेदारी दिली आणि त्यांनी यांची जीमेदारी घेत येथील रेल्वे अधिकारी व जिल्हा अधिकारी यांचा सतत पाठपुरावा घेऊन आज दिनांक, 14,06,2023,ला लास्ट बैठक जिल्हा अधिकारी कार्यालयात लावण्यात आली या वेळी मा. जिल्हाधिकारी कार्यालयात महाकाली कॉलरीतील नागरिक रेल्वे विभाग चे अधिकारी शर्मा, महानगर पालिका चे पाटील,उपविभागीय महसूल अधिकारी पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर विजय इंगोले, माझी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टीवार,माझी नगर सेवक प्रदीप किरमे,गोगुलवर, RD बाबा यांची उपस्थिती होते.या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून शासनाकडून मोबदला व येथील काही नागरिकांना प्रधान मंत्री आवस योजनेतून घरे देण्याचा आदेश दिला.या निर्णयामुळे माहाकाली कॉलरी मधील नागरिकांनी मा. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माझी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टीवार यांचे आभार मानले.