Home वरोरा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य फळवाटप.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य फळवाटप.

वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा.

वरोरा:-

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या १४ जून ला होणाऱ्या वाढदिवसाला महाराष्ट्र सैनिकांनी गोरगरीब मुलांना वह्या पुस्तके व गरिबांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान आता शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वरोरा तर्फे उपजिल्हा रुग्णालयात गरीब रुग्णांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना फळे व बिस्कुट वाटप करून राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने घेण्यात येणाऱ्या फळवाटप कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळो व महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला बळ मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे महिला सेना तालुका अध्यक्ष रेवतीताई इंगोले, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर, शहर विभाग अध्यक्ष प्रतीक मुडे सूरज मानकर, भदुजी गिरसावळे,
लक्ष्मी गिरसावळे. प्रथम साव, रोहन ढोके अतुल नन्न्नावरे, अक्षय कापटे. अनिकेत किन्नाके व इतर महाराष्ट्र सैनिकांची उपस्थिती होती.

Previous articleपुन्हा एकदा माझी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टीवार आले धावून माहाकाली कॉलरी मधील नागरिकाना मोठा दिलासा
Next articleचंद्रपुरात नागरिक पाहतात टँकरची वाट अमृतच्या दुसऱ्या टप्प्याने होणार टँकर मुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here