काय आहे भाजपचा ऍक्शन प्लान ? विधानसभा प्रमुख म्हणजे उमेदवारी आहे का ?
लक्षवेधी :-
खरं तर भाजपचा ऍक्शन प्लान हा कधीही सार्वजनिक नसतो तर तो भाजपच्या कोअर कमेटीचा तो हिस्सा असतो. जे वरकरणी राजकीय चित्र दिसत असते ते मुळात खरं नसते हे आजवरच्या भाजपच्या राजकीय रणनीतीवरून स्पष्ट होईल, पण भाजपचे वरिष्ट पदाधिकारी एखाद्या बाहेरील पक्षाच्या नेत्याला जेव्हा भाजप प्रवेश करायला लावतात तेंव्हा ते म्हणतात की आम्ही तुम्हांला उमेदवारी देण्याचं बघू पण ते कधीही म्हणत नाही की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. अर्थात उमेदवारी देणे हे किंव्हा नाकारणे हे सर्वस्वी दिल्ली दरबारात ठरते हे महत्वाचे.
भाजपने नुकतीच लोकसभेच्या तयारीकरिता विधानसभानिहाय विधानसभा प्रमुखांची नियुक्ती केली व ती सार्वजनिक सुद्धा करण्यात आली. पण आश्चर्य या गोष्टींचे आहे की भाजप मध्ये ज्या व्यक्तींनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा फार्म भरला नाही किंव्हा रीतसर भाजप मध्ये पक्ष प्रवेश घेतला नाही अशा रमेश राजूरकर यांचे नाव वरोरा विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख म्हणून नमूद आहे,म्हणजे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांना कुठलीही माहिती नसतांना व भाजपचे प्राथमिक सदस्य नसतांना परस्पर रमेश राजूरकर यांना विधानसभा प्रमुख पण देण्यात आले असल्याने त्यांच्या या पदामुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर तर झाली नसावी अशी शंका व चर्चा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सुरू आहे.
काय आहे भाजपचा ऍक्शन प्लान ?
महाराष्ट्रात भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करताना विधानसभा निहाय नियुक्त्या करीत आहे. भाजप ने राज्यातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहे. कारण विधानसभा प्रमुख म्हणजे त्या विधानसभा क्षेत्राचा आढावा हा राज्यातील कोअर कमेटीकडे पाठवणार आणि त्यानुसार मग वरील कोअर कमेटीचे सदस्य त्यावर आपण कुठे मागे आहो किंव्हा त्या विधानसभा क्षेत्रात नेमकी काय प्लानिंग करायची हे ठरवतील आणि म्हणून विधानसभा प्रमुखांची जी कामे आहेत ती पोस्टमन ची कामे आहेत, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घ्यायची व ती आपल्या स्वाक्षरीने राज्याच्या कोअर कमेटीकडे पाठवायची एवढीच जबाबदारी विधानसभा प्रमुखाची आहे.
विधानसभा प्रमुख म्हणजे उमेदवारी आहे का ?
वरोरा विधानसभा क्षेत्रात मागील वेळी मनसेच्या तिकिटावर लढणारे राजूरकर हे भाजप मध्ये पक्ष प्रवेश करायच्या अगोदरच विधानसभा प्रमुख झाले ही खरे तर भाजपच्या आजवरच्या राजकारणात घडलेली एकमेव घटना असेल. दरम्यान मागील सन 2014 झालेल्या निवडणुकीत भाजप सेना युती तुटल्यानंतर भाजपने काँग्रेस चे संजय देवतळे यांना ऐन वेळेवर म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या काही तास आधी उमेदवारी देऊन त्यांना भाजप कडून उभे केले होते व त्यावेळी ते अल्पशा मताने पडले व शिवसेनेचे बाळू धानोरकर हे निवडून आले. त्यावेळी पण भाजप चे प्राथमिक सदस्य नसणाऱ्या संजय देवतळे यांना भाजप ने उमेदवारी दिली होती हे खरे आहे. पण विधानसभा प्रमुख म्हणजे उमेदवारी नव्हे हे समजून घेणे महत्वाचे आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रामदास आंबटकर यांना प्रमुख बनवले हे स्वतः विधानपरिषद चे आमदार आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे बंटी भांगडीया आमदार आहेत पण विधानसभा प्रमुख पद हे गणेश तळवेकर यांच्याकडे आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत मात्र त्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी ही चंदनसींग चंदेल यांच्याकडे आहे, मग भाजपचे जिथे रुटीन आमदार आहेत तिथे पण विधानसभा प्रमुखांची नियुक्ती असेल तर आमदारकीचे डोहाळे ज्या रमेश राजूरकर यांना लागले त्यांना वरोरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी कुठल्या निकषावर मिळेल हे कळायला मार्ग नाही. अर्थात भाजपने 288 विधानसभा क्षेत्रात जी विधानसभा निहाय यादी करण्यात आली, त्यातून स्पष्ट होते की ती उमेदवारांची यादी नव्हे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी करिता केलेली यादी आहे.