Home चंद्रपूर राजकीय कट्टा :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा उमेदवारीत राजेश बेले यांची दमदार एन्ट्री ?

राजकीय कट्टा :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा उमेदवारीत राजेश बेले यांची दमदार एन्ट्री ?

सामाजिक समीकरणात राजेश बेले यांची उमेदवारी निर्णायक ठरणार ?

राजकीय कट्टा:-

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे आता वारे वाहायला सुरुवात झाली असुन चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजप कडून डॉ. अशोक जिवतोडे, हंसराज अहिर व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची नावे चर्चेत आहे तर काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर, प्रकाश देवतळे , विनायक बांगडे व ऐन वेळेवर शिवानी वडेट्टीवार उमेदवार ठरू शकण्याची शक्यता आहे, मनसे कडून मनसेचे नेते राजु उंबरकर यांची उमेदवारी अगोदरच जाहीर झालेली आहे अशातच सामाजिक चळवळीत आपले अमूल्य योगदान देणारे पर्यावरण प्रेमी राजेश बेले यांच्या लोकसभा निवडणुकीतील एन्ट्री ने सामाजिक समीकरणे बदलू शकतात असे चित्र दिसतं आहे. शिवाय त्यांचे जिल्ह्यात संजीवनी पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून विविध मुद्याला घेऊन होत॑ असलेले आंदोलन यामुळे त्यांच्याप्रती जनसामान्य माणसात चांगली छबी निर्माण होत॑ आहे. दरम्यान त्यांचे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात विविध ठिकाणी लागलेले होर्डिंग जनतेचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास बघता इथे ओबीसी समाजाचा चेहरा हाच निर्णायक ठरतो असे समीकरण आहे. अर्थात हंसराज अहिर हे अल्पसंख्यांक असले तरी ते ओबीसी प्रवर्गात मोडतात व भाजपच्या पक्ष संघटनेमुळे त्यांना आजपर्यंत चार वेळा निवडून येण्याचा मान मिळाला पण मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लॉट असतांना सुद्धा काँग्रेस चे बाळू धानोरकर यांच्या समोर ते टिकू शकले नाही, यावरून येथील जनतेला परिवर्तन पाहिजे आहे हे स्पष्ट होते, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत नव्या दमाच्या उमेदवारांना जनता पसंत करतील अशी दाट शक्यता आहे.

राजेश बेले यांनी काही वर्षांतच आपल्यां संजीवनी पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्दोगात होत॑ असलेले प्रदूषण, महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागात होत॑ असलेला भ्रष्टाचार, वेकोलित प्रकल्पग्रस्त लोकांना मिळतं नसलेली नौकरी याबद्दल आवाज उचलून प्रसंगी आंदोलन उभारले व आपली सामाजिक ओळख निर्माण केली, नुकतेच ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये व ओबीसीच्या इतर मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेले लाक्षणिक उपोषणात त्यांचा सक्रिय सहभाग होता, तेली समाजाच्या प्रत्तेक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो तर नुकताच चंद्रपूर च्या दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने त्यांनी भारताचे संविधान संदर्भातील पुस्तके मोफत वाटप करून सामाजिक समन्वयाचा एक अध्याय निर्माण केला, जिथे जिथे अन्याय व भ्रष्टाचार तिथे तिथे राजेश बेले यांची एन्ट्री ही ठरलेली बाब असल्याने जनसामान्य जनतेला अपेक्षित असे काम राजेश बेले यांच्या माध्यमातून होत॑ असल्याने येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते काय रणनीती करताहेत व प्रस्थापित पक्षाच्या उमेदवरसमोर काय आव्हान उभे करणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleअल्पवयीन वाहनचालक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू ४१ वाहनचालकांवर कारवाई
Next articleशिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा युवासेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here