Home चंद्रपूर रामनगर वॉर्डातील कचरा डेपोला तात्काळ हटवा…

रामनगर वॉर्डातील कचरा डेपोला तात्काळ हटवा…

सम्यक बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष प्रलंय तेलंग यांचासह नागरिकांची मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी...

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

हिंगणघाट :- सम्यक बुद्ध विहार प्रबुद्ध नगर च्या मागच्या बाजूस नगर परिषद हिंगणघाट द्वारा कचरा डेपोच्या अड्डा तयार करण्यात आला आहे. त्याला लागूनच नूतन शाळा व पाण्याची टाकी आहे. कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा निवेदने देऊन हि तो कचरा डेपो हटविण्यात आला नाही. दहा दिवसांच्या आत कचरा डेपो हटविन्यात आला नाही तर तो संपूर्ण कचरा नगरपरिषद मध्ये आणून टाकू असे निवेदने सम्यक बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष प्रलंय तेलंग यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी सम्यक बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष प्रलंय तेलंग यांच्यासह शाहरूख बक्ष,अमित झांबरे, वज्रपाल बोधिले, अमरदीप बन्सोड, बालू बरहते, संजय बरहते, सुदुल इतकं, सक्षम खेडकर ,कविताताई मानकर, मनिषा खेडकर आम्रपाली भालशंकर, सविता झिलते, बबिता ढेपे, निर्मलाताई भोंगाडे, पायल उईके, लक्ष्मीबाई वानकर, रेखा इंदूरकर, अन्नपूर्णाताई बन्सोड, भारती झांबरे, चंद्रकलताई उमरे, अश्विनी पाटील, आदी सदस्य व वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous articleबचतगटाच्या महिलांनी साजरी केली “जल दिवाळी’
Next articleकॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 10% बोनस देण्यात यावा.म रा शि प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here