Home वरोरा आंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,

आंदोलन :-सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण अखेर सुटले,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंबा व शेतकऱ्यांच्या सहकार्याने प्रशासनाने केल्या मागण्या पूर्ण, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार,

वरोरा :-

मागील पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या शासन दरबारी सोडवल्या जाव्या व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले होते.दरम्यान स्थानिक प्रशासनाने व राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी या आमरण उपोषणाकडे पाठ फिरवली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते विशाल देठे यांच्या माध्यमातून मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस आरिफभाई शेख, अनिल झळेकर, पोपटराव जानकर, उपाध्यक्ष सुधीर खापने हे चंद्रपूर च्या दौऱ्यावर असताना त्यांनी किशोर डुकरे यांच्या आंदोलनाला भेट देऊन स्थानिक तहसीलदार यांच्याशी चर्चा केली व आपण तालुक्याचे एक जिम्मेदार अधिकारी म्हणून या आंदोलनाला गंभीरपणे का घेत नाही हा सवाल करून तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी केली, यावेळी ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी भ्रमणध्वनीवरून इशारा देत जर उद्या विमा कंपनीचा प्रतिनिधी उपोषण मंडपात दिसला नाही तर तुझ्यासह तुझ्या कंपनीचे कार्यालय फोडल्या जाईलअसा इशारा दिला होता, त्यामुळे प्रशासनाची चक्रे फिरायला लागली आणि किशोर डुकरे यांच्या उपोषण स्थळी तहसीलदार कृषी अधिकारी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी आज दिनांक 16 फेब्रवारी ला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात झालेला घोळ लवकरच दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पैसे टाकल्या जाईल असे आश्वासन दिले, या सोबतच पान्धन रस्ते आणि सातबारा फेरफार संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावल्या जाईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांच्याकडून मिळाल्यानंतर किशोर डुकरे यांना तहसीलदार योगेश कौटकर यांनी उसाचा रस पाजून आमरण उपोषण आज दुपारी 12.30 च्या दरम्यान मागे घेतले,

किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण हे शेतकऱ्यांसाठी होते व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत लढत आहे, त्यामुळे मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, उपाध्यक्ष राजु कुकडे यांच्या नेत्रुत्वात या आंदोलनाला पाठिंबा देत चक्क मनसेचे राज्यस्तरीय नेते उपोषण स्थळी बोलावून प्रशासनाला एक प्रकारे घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळतं नाही त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना आम्ही अगोदर हात जोडून न्याय मागतो नाहीच ऐकलं तर हात सोडतो असा गर्भगळीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता, दरम्यान आज प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्या पण त्यांची पूर्तता जर एका महिन्यात झाली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी प्रशासनाला दिला, यावेळी तहसीलदार कौटकर, नायब तहसीलदार काळे , कृषी तालुका अधिकारी, ओरिएंटल विमा कंपनीचे प्रतिनिधी व पोलीस अधिकारी यासह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

सतत पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांना अशक्तपणा आला होता व त्यांना उभं राहणं सुद्धा कठीण झालं होतं. दरम्यान मनसेचे नेते यांनी उपोषण मंडपात किशोर डुकरे यांची भेट घेऊन प्रशासनाकडून होतं असलेले दुर्लक्ष यामुळे संताप व्यक्त करत तहसीलदार कौटकर यांना धारेवर धरले होते व याबाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे पक्षाची भूमिका मांडत असताना किशोर डुकरे यांना चक्कर आली व ते खाली कोसळले, दरम्यान तातडीने डॉक्टरांना बोलवून उपचार करण्यात आले

Previous articleचंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणची कार्यकारिणी जाहीर
Next articleआमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने महाकाली मैदानात रंगला कुस्तीचा महामुकाबला, सिकंदर ठरला अजिंक्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here