Home चंद्रपूर चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात बाजार...

चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात बाजार चौक नेरी येथे कॉर्नर सभा संपन्न

चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात

बाजार चौक नेरी येथे कॉर्नर सभा संपन्न

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली-चिमूर- महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा. अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ दिं.१६ एप्रिल २०२४ रोज मंगळवार ला नेरी येथील बाजार चौकात खा.अशोकजी नेते यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कॉर्नर सभा घेण्यात आली. या सभेला मोठया संख्येने अनेक महिला पुरुषांनी हजेरी लावली होती.
या सभेला मार्गदर्शक म्हणून खा. अशोकजी नेते डॉ. श्यामजी हटवादे भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य, कमलाकर जी लोणकर जेष्ठ नेते भाजप , दत्तूजी पिसे जेष्ठ नेते ,नरेंद्र पंधरे शहर अध्यक्ष भाजपा,मंगेशभाऊ धाडसें सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर गुरूभाऊ पिसे ,संदीप भाऊ पिसे जी प्रमुख मायाबाई ननावरे तालुका अध्यक्ष महिला आघाडी,डॉ गजभे साहेब,आदीसह अनेक भाजपा नेते मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते
या कॉर्नर सभेला महायुतीचे उमेदवार अशोकजी नेते यांनी बोलतांना देशाला महासत्ता बनवायची असेल ,देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असेल आणि विकसित भारत निर्माण करायचे असेल तर कमळाच्या चिन्हावर मत द्या अशी साद मतदारांना केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षे जो विकास केला आणि देशाला प्रगतीपथावर नेले याबद्दल माहिती दिली तसेच पंतप्रधान मोदी साहेबांच्या अनेक योजना ची माहिती देऊन त्यांच्या योजना घराघरात पोहचल्या असून देशातील नागरिकांच्या विकासाला चालना मिळाली आहे शेतकरी शेत मजूर बेरोजगार याना घेऊन चालणारा आणि त्यांचा विकास साधणारा एकमेव नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच परत सत्तेची सूत्रे हाती देण्यासाठी आपले अमूल्य मत कमळा समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. केलेल्या कामाची माहिती दिली निधी उपलब्ध करून विकास साधला अन्न पाणी धान्य निशुल्क वितरण प्रणालीची माहिती देऊन येणाऱ्या काळात आपला देश विकसित भारत म्हणून उदयास येणार आहे तेव्हा 19 एप्रिलला कमळ चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतानी निवडून द्यावे असे आवाहन केले या सभेला डॉ श्यामजी हटवादे कमलाकर लोणकर आदींनी सुद्धा सभेला संबोधित केले भाजपाचे उमेदवाराला भरघोस मतांनी निवडुन देण्याचे आवाहन केले या सभेचे संचालन आभार दत्तूजी पिसे यांनी केले यावेळी नेरी ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here