Home वरोरा सनसनिखेज :- आयपीएल सट्टा अड्ड्यावर लेडी सिंघम नयोमी साटम यांची धाड,

सनसनिखेज :- आयपीएल सट्टा अड्ड्यावर लेडी सिंघम नयोमी साटम यांची धाड,

दोघांना अटक तर इतर आरोपी फरार,जिल्ह्यातील आयपीएल सट्ट्यावर पहिलीच कारवाई, सट्टा खेळणारे नागपूर वणी वरोरा व भद्रावती येथील असल्याची पोलिसांची माहिती.

वरोरा :-

वरोरा येथे लेडी सिंघम म्हणून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी काल सायंकाळी आयपीएल सट्ट्यावर धाड टाकून दोन आरोपीना अटक केल्याची सनसनिखेज माहिती समोर आली असून अटक केलेल्या आरोपीसह सट्टा खेळणाऱ्या जवळपास 30 लोकांविरोधात वरोरा पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्या या कार्यवाहीने सट्टा बाजारात मोठी खळबळ उडाली असून कोट्यावधीच्या या जुगारात काही प्रतिष्ठित व मोठे व्यापारी असल्याने सर्वांचे धाबे दाणाणले आहे. दरम्यान ज्या सट्टा लावणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले त्यात नागपूर वणी वरोरा भद्रावती या शहरातील लोकांचा समावेश आहे.

काही महिन्यापूर्वी नयोमी साटम यांनी पदभार सांभाळल्यानंतर आपल्या पदाला न्याय देत त्यांनी धडाकेबाज कार्यवाहीला सुरुवात केली, मग अवैध दारू विक्री असो, अवैध रेती उत्खनन व वाहतूक असो की सट्टापट्टी असो त्यांनी अच्छा अच्छाचा बाजार उठवला आणि कायज्ञापुढं कुणी मोठा नाही हे दाखवून दिलं, दरम्यान जिल्ह्यात एवढी वर्ष होऊन सुद्धा आयपीएल सट्ट्यावर कुणी धाड टाकून मोठी कार्यवाही करू शकले नव्हते, मात्र आपल्या धडक कार्यवाईने वरोरा भद्रावती तालुक्यात लेडी सिंघम म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी दि.१२/०५/२४ रोजी आय.पी.एल. मॅचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळत असलेल्या घरी धाड मारून दोन आरोपी ना अटक केली, दरम्यान त्यांच्या या कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होतं आहे.

सहायक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, उपविभाग वरोरा यांनी, गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पो.स्टे. वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व पोलीस स्टाफसह, l गुघाने यांचे घरी, बावने ले आउट, साई मंगल कार्यालयाच्या बाजुला, वरोरा येथे आय. पी. एल. वर सटटा खेळणारे आरोपीवर रेड केली असता, एक खोली मध्ये १) ओमप्रकाश देविदास जाधव, व २) आशिष गजानन जाधव, रा. वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहाने, चिन्नस्वामी स्टेडीयम, बेंगलोर येथील ग्राउंडवर, चालु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हारजितचा जुगार खेळ खेळीत (सटट्रा लावतांना) असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक अॅक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२,७४० रू. असा एकुन ०२,६७,४१० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व आरोपी नामे १) ओमप्रकाश देविदास जाधव, वय-४३वर्ष, २) आशिष गजानन जाधव, वय-२७ वर्ष दोन्ही रा. सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, पाहीजे आरोपी ३) मिनाज शेख रा. वणी जि. यवतमाळ ४) जम्मु शेख रा.वणी जि. यवतमाळ ५) रितीक जाधव रा. वरोरा. ६) अमोल डांगरे रा. वरोरा ७) अमोल टिपले रा. बरोरा ८) बादल लाखा रा. वरोरा ९) भुषण दिक्षीत रा. वरोरा १०) डॉ. काळे रा.वरोरा ११) अजिंक्य नरडे रा. वरोरा १२) अमित घोडमारे रा. वरोरा १३) समीर पाटील रा.वरोरा १४) सुरज रा. बुटट्टीबोरी नागपुर. १५) राजेश तुपकर रा. वरोरा १६) रवि गभणे रा.वरोरा १७) राहुल टिपले रा. वरोरा १८) पिंन्टु तडस रा. वरोरा १९) पिंन्टु टोंगे रा. वरोरा २०) प्रसाद खडसान रा. वरोरा २१) कुणाल चिमुरकर रा. वरोरा २२) मोहीत शर्मा रा. वरोरा २३) अनिल पाटील रा. वरोरा २४) पंकज वैद्य रा. वरोरा २५) अमित भगत रा. वरोरा २६) गौरव रा. वरोरा २७) रणजित रा. वरोरा २८) अतुल वानखेडे रा. वरोरा २९) मंगेश रा. भद्रावती ३०) मंगेश रा. वरोरा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.

सदर कारवाई श्री मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, श्रीमती. रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली, श्रीमती. नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग वरोरा, सपोनि विनोद जांभळे, पो.अं. दिपक दुधे, दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here