Home चंद्रपूर खळबळजनक :- जीवतोडे यांच्या दबावाने सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्याचे शपथपत्र जाहीर होणार?

खळबळजनक :- जीवतोडे यांच्या दबावाने सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्याचे शपथपत्र जाहीर होणार?

डॉ अशोक जीवतोडे यांच्यावर एसआयटी चौकशीची टांगती तलवार, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा महाविद्यालयातील जवळपास 10-12 प्राध्यापक अध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी लिहून दिली शपथपत्र.

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक जीवतोडे यांनी नियम अटी व बिंदू नियमावलीचा भंग करून आणि दबावतंत्राचा वापर करून शिक्षक, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना स्वेच्छानिवृत्ती कारण्यास भाग पाडले व नियमबाह्य पदभारती घेऊन जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त रुपयानी शासनाची फसवणूक केली त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा व संस्था सचिवावर गुन्हा दाखल करा अन्यथा मला प्राणातिक उपोषण करावे लागेल असा इशारा जनता शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष गोपाळ सातपुते यांनी दिनांक 17 मे ला चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे दिला होता, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. दरम्यान हे प्रकरण गाजत असतानाच आता चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक जीवतोडे यांनी नव्याने शिक्षक व इतर कर्मचारी भरती घेण्यासाठी चक्क ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले त्यांनी आपले शपथपत्र लिहून देऊन आपली व्यथा जाहीर केल्याने चांदा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

लक्षवेध :- कोट्यावधी रुपयांनी शासनाची फसवणूक करणाऱ्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ सचिवाच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या माध्यमातून जनता महाविद्यालय सह एकूण 15 शाळा महाविद्यालय चालवल्या जातात त्या शाळा महाविद्यालयात जवळपास दीड ते दोन हजार शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम करतात, मात्र संस्थेचे सचिव डॉ अशोक जीवतोडे हे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर दडपशाही करून त्यांना स्वेच्छानिवृत्ती करायला भाग पाडत आहे व स्वतःच्या मर्जीने बेकायदेशीर शिक्षक भरती करून शासनाची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करीत असल्याची तक्रार सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ सातपुते यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांच्याकडे पुराव्यासह केली होती, परंतु त्यावर कुठलीही चौकशी करण्यात आली नाही, दरम्यान गोपाळ सातपुते यांच्या तक्रारीची दखल घेऊन आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार व आमदार अमर काळे यांनी विधानसभा सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ सचिव यांच्या बेकायदेशीर शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर भरतीची चौकशी ची मागणी केली होती,

हेही वाचा

गंभीर :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील कसे झाले फरार?

दरम्यान या प्रकरणाची चौकशी लागली पण स्थानीय शिक्षणाधिकारी यांनी 9 मुद्यापैकी केवळ तीन मुद्याची चौकशी केली व 6 मुद्याची चौकशी केली नव्हती त्यामुळे परत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना तक्रार देऊन 6 मुद्याच्या चौकशीची मागणी केली व त्यावर चौकशी सुरु आहे, पण शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या माध्यमातून जीवतोडे हे प्रकरण दडपत आहे, त्यामुळे येत्या एक ते दीड महिन्यात चौकशी करून कारवाई करा अन्यथा शिक्षण प्रशासनाविरोधात मी प्रानांतिक उपोषण करेन असा इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ सातपुते यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारा दिला आहे. दरम्यान आता जीवतोडे यांच्या दडपशाहीला बळी पडून ज्या प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वेच्चनिवृत्ती दिली त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून दिल्याने संस्थेचे सचिव डॉ जीवतोडे यांच्या विरोधात मोठे पुरावे मिळाले आहे, त्यामुळे एसआयटी चौकशी झाल्यास चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवर प्रशासक बसण्याची व नियमबाह्य झालेल्या शिक्षक कर्मचारी भरतीचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता बळावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here