Home चंद्रपूर धक्कादायक :- उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर पाटील सोबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पण...

धक्कादायक :- उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर पाटील सोबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पण एसआयटीच्या रडारवर?

जिल्ह्यातील बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकानंदार यांच्याकडून परवाने संदर्भात व हप्ता वसुली ची पण चौकशी होणार?

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, निरीक्षक जितेंद्र गुरनुले, प्रशांत पाटील यांनी पहिल्यांदाच एका मोठ्या सरकारी रॉकेट चा पर्दापाश करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर दोन लोकांना बिअर शॉपी लायसन्स प्रकरणी एक लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले होते, दरम्यान घटनास्थळी अधीक्षक संजय पाटील नव्हते पण त्यांच्या आदेशानेचं एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांचे विरुध्द लाप्रवि द्वारा कार्यवाही करण्यात आली व गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु ज्या प्रकरणात अधीक्षक संजय पाटील यांना अटक झाली त्या प्रकरणात केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागचं दोषी आहे असे नाही तर परवाने देण्यासाठी जी रक्कम बरोबरीची हिस्सेवाटप होतं होती त्यात अंतिम लायसन्स मंजूर करणारे जिल्हाधिकारी व ना हरकत प्रमाणपत्र व अहवाल देणारे जिल्हा पोलीस अधीक्षक हे सुद्धा दोषी असल्याने आता एसआयटी प्रकरणात खरंच दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही होईल का याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

नवीन बिअर शॉपी, बिअर बार व ट्रान्सफर झालेल्या वाईन शॉपी देशी दारू दुकान यांना परवाने देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली एक समिती बनविण्यात आली होती, या समितीत अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता, दरम्यान नवीन परवाने किंव्हा ट्रान्सफर दुकानें यासाठीचे प्रस्ताव हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात दाखल करायचे होते, त्यामुळे बिअर बार, बिअर शॉपीच्या परवाण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्याचे काम होते, त्यात कागदपत्राची पूर्तता व या संबंधाने त्रुटी काढायचे काम याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्याकडे असल्याने त्यांनी प्रत्येक प्रकरणात मोठी रक्कम घेतली होती हे सत्य आहेच, पण सोबतच स्थानिक पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस कार्यालय यांना सुद्धा ना हरकत घेण्यासाठी पैसे मोजावे लागले व शेवटी अंतिम मंजुरी करिता जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा परवाने धारक यांना पैसे द्यावे लागले हे सुद्धा खरे आहे, त्यामुळे या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे सुद्धा गुंतले आहेत हे स्पष्ट होते, अर्थात उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांची एसआयटी चौकशी लागली तर जिल्हाधिकारी व तत्कालीन पोलीस अधीक्षक यांची पण चौकशी होणार हे क्रमप्राप्त आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक थोरात पण रडारवर?

एका नवीन बिअर शॉपीचा परवाना संदर्भात अधीक्षक संजय पाटील यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील, चेतन खारोडे, दुयम निरीक्षक अभय खताळ कार्यालय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एक लाख रुपयाची लाच मागितल्याची खात्री केल्यानंतर त्यांचे विरुध्द लाप्रवि द्वारा कार्यवाही करण्यात आली होती. त्यातील चेतन खारोडे, दुयम निरीक्षक अभय खताळ, तसेच कार्यालय अधीक्षक यांना अटक करण्यात आली होती. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील हे फरार झाले होते. त्यांनी अग्रिम जमानतीसाठी कोर्टाचे दार ठोटावले होते, परंतु त्यांना न्यायालयातून जामीन मिळाली नव्हती. शेवटी त्यांना जामीन मिळाला पण त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून परवाने धारकाकडून लाखों रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांच्यावर पण गुन्हे दाखल व्हायला हवे, कारण यांच्याकडे वरोरा भद्रावती यासाह चिमूर, ब्राम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही व मुल सावली इत्यादी तालुक्यातील परवाने देण्यासंदर्भात अहवाल तयार करण्याचे कार्य होते व त्यांनी सगळ्याचं बिअर बार, बिअर शॉपी व देशी दारू दुकानदाराकडून लाखों रुपये घेतल्याचे पुरावे मिळत आहे, त्यामुळे एसआयटी चौकशीत निरीक्षक थोरत हे सुद्धा चौकशीत अडकणार आहे, दरम्यान ते बिअर बार बिअर शॉपी व वाईन शॉपी देशी दारू दुकानदाराकडून दरमहा स्टॉक बुक सादर करण्याच्या वेळी किती पैसे घेतात याबद्दल सुद्धा ऑडिओ समोर आले असून ते बातमी च्या माध्यमातून व्हायरलं होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here