Home वरोरा चिंतनीय :- दिंडोदा ब्यारेज प्रकल्पग्रस्त देविदास देठे यांची कर्जाच्या बोझ्याला कंटाळून आत्महत्या.

चिंतनीय :- दिंडोदा ब्यारेज प्रकल्पग्रस्त देविदास देठे यांची कर्जाच्या बोझ्याला कंटाळून आत्महत्या.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या आंदोलनाच्या आदल्या दिवशीचं आपले जिवन संपविणाऱ्या देठेच्या निधनाने गावात शोककळा.

माढेळी (मोहित हिवरकर):-

दिंडोदा ब्यारेज प्रकल्पग्रस्त नागरिकांनी दिनांक 25 मे ला प्रकल्प असलेल्या दिंडोडा येथे वाढीव मोबदला साठी आंदोलन जाहीर केले होते त्या आंदोलनाच्या आदल्या दिवशीचं प्रकल्पग्रस्त शेतकरी देविदासजी महादेवराव देठे यांनी आत्महत्या करून जीवन संपविल्याने गावात शोककळा पसरली आहे

मागील अनेक वर्षांपासून येवती, केळी, माढेळी दिंडोडा व इतर चार गावाच्या जमिनी दिंडोडा बॅरेज प्रकल्पात गेल्या पण शेतकऱ्यांच्या शेतीला योग्य तो भाव व प्रकल्पग्रस्त म्हणून कुटुंबातील एकाला नौकरी ह्या मागण्या सरकारने मान्य न करता प्रकल्पाचे काम सुरु केले दरम्यान एकीकडे सरकारने शेत जमिनी घेतल्या पण पैसे दिले नाही तर आज उद्या शेती प्रकल्पात जाणार म्हणून शेतात कसे तरी पीक घेत असताना शेतीत उत्पन्न झाले नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली मरण यातना भोगत आहे तर दुसरीकडे सरकारच्या उदासीन धोरणामुळे कुठेही प्रश्न सुटत नसल्याने व पर्याय दिसत नसल्याने वाढत असलेले कर्ज व सावकारांची दडपशाही यामुळे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे अशीच आत्महत्या येवती येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी देविदासजी महादेवराव देठे यांनी दिनांक 24 मे ला दुपारी केल्याने गावात शोककळा पसरली आहे.

देविदासजी महादेवराव देठे वय 65 वर्ष हे दिंडोदा ब्यारेज प्रकल्प ग्रस्त होते त्यांना अजूनही वाढीव मोबदला न मिळाल्याने कर्जापाई आत्महत्या त्यांनी केली, दरम्यान त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती ब्यांकेचे पण कर्ज होते ते मोबदला मिळेल या आशेवर अत्यंत तणावात जीवन जगत होते शेवटी कोणतीही मदतीची अपेक्षा न दिसल्यामुळे त्यांनी शेवटी जीवनयात्रा सपविली, गावालागत असलेल्या नर्सळी मध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मागे पत्नी मुलगा सून व दोन नातवंड असा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here