Home वरोरा लक्षवेध :- मराठी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळविणारे अनिल वरखडे एक उत्तुंग व्यक्तिमत्व.

लक्षवेध :- मराठी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळविणारे अनिल वरखडे एक उत्तुंग व्यक्तिमत्व.

वरोरा शहराला मराठी चित्रपटसृष्टीच्या विश्वात सन्मान मिळवून देण्यात त्यांचा मानस कौतुकास्पद.

व्यक्तीविशेष :-

आयुष्य ही अवघड शाळा आहे, कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठावूक नसतं, कोणती परिक्षा आहे हे पण आपल्याला माहीत नसतं. या परिक्षेत इतरांची कॉपी देखील करता येत नाही. कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते. पण अशा आयुष्याच्या शाळेत स्वतःच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर यशाची भरारी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करणारे काही लढवंय्ये योद्धे मिळतात त्या योद्धात अनिल वरखडे यांचं नाव कोरलं जाईल असं उत्तुंग व्यक्तिमत्व त्याचं आहे. कारण कुठलाही सांस्कृतिक, साहित्यिक वारसा नसताना केवळ शिवछत्रपतींच्या मराठी स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात यावी व पुन्हा या महाराष्ट्रात मराठी मनाचं, मावळ मातीचं राज्य निर्माण व्हावं म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे वरोरा येथील चित्रपट निर्माते अनिल वरखडे यांनी “शेर शिवराज” सारखा मराठी चित्रपट निर्माण करून तो महाराष्ट्रभर गाजवला, महाराष्ट्रातील अनेक शहराच्या चित्रपटगृहात या चित्रपटाची मोठी चर्चा झाली,

अनिल वरखडे यांनी वरोरा शहरात राजकीय क्षेत्रात आपले योगदान देतांना अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले, स्वतः नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरु करतांना जनसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन त्यांनी शहरात व तालुक्यात सामाजिक चळवळ राबवली व अनेकांना न्याय मिळवून दिला, विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देऊन कराटे, मलखाम सारखे प्रशिक्षण राबविले आणि बजरंग दल च्या माध्यमातून शिवछत्रपतींची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्याची नव्या पिढीतील युवकांना प्रेरणा दिली,

वरोरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक तथा चित्रपट निर्माते अनिल वरखडे यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळवीला आहे, शेर शिवराज, सापळा, केस नंबर 99 व नुकताच प्रसिद्ध झालेला सुभेदार असे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माण करून वरोऱ्याच्या सुपुत्राने मराठी चित्रपटसृष्टीत आपली दमदार एन्ट्री केली, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे अनिल वरखडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाय रोवून आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय दिला व वरोरा शहराचा राज्यात मान वाढवीला दरम्यान युवा पिढीचे मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे नवी तरुणाई मोठी अपेक्षा ठेऊन आहे, त्यांचा आज वाढदिवस असल्याने उत्तरोत्तर त्यांच्या या कार्याचा आलेख असाच वेगाने वाढत राहो व नवा वैभवशाली समाज घडविण्याचा त्यांचा संकल्प साकार होवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व त्यांच्या पुढील वाटचलीस लक्ष लक्ष शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here