Home चंद्रपूर दखल :- अखेर कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर सिएसटिपीएसने ठोठावला 95 हजाराचा दंड.

दखल :- अखेर कंत्राटदार अनिल डोंगरे यांच्यावर सिएसटिपीएसने ठोठावला 95 हजाराचा दंड.

भाजयुमो राज्य उपाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या श्रीराम एंटरप्रायजेस कंपनीला वृक्ष लागवड व देखभाल करण्याचे मिळाले होते कंत्राट

चंद्रपूर :-

स्थानिक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कंत्राट घेऊन भ्रष्टाचार चालवला असल्याच्या चूरस कथा प्रसारमाध्यमातून नेहमीच चर्चेत असतात अशातच महाराष्ट्र शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, यांना देण्यात आलेल्या लक्षानुसार एकूण ४०,००० वृक्ष लागवड कचराळा अॅश बंड भागात वन विभाग, चंद्रपूर यांनी पुरविलेल्या वृक्षांचे रोपन करण्यात आले. सदर वृक्ष लागवडीच्या देखभालाचे कंत्राट भाजयुमो चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या श्रीराम एंटरप्रायजेसला देण्यात आले होते. यामध्ये वृक्ष लागवड यासह देखभाल करण्याचे पण कंत्राट होते, मात्र सदर ठिकाणी लावलेली झाडे पूर्णतः मेली त्यामुळे झाडांची देखभाल व्यवस्थित न केल्या प्रकरणी सिएसटीपीसए व्यपस्थापनाने श्रीराम एंजरप्रायजेसला ९५.४३६ दंड आकारला असल्याची माहिती असून हे प्रकरण भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टलने लावून धरले होते त्याचा प्रभाव सीएसटीपीएस व्यवस्थापनावर झाल्याने सदर कार्यवाही झाल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान प्रशासनावर राजकिय दबाव टाकुन बोगस कामाची बिले उचलणा-या कंत्राटदारावर व कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता परस्पर बिले मंजूर करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी सामाजिक सिएसटीपीएस प्रशासनाच्या त्या अधिकाऱ्यावर पण दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.

दरम्यान वन विभाग, चंद्रपूर यांनी दिलेल्या ४०,००० वृक्षांचे एकूण रु ३.२० लक्ष सक्षम अधिका-याच्या मंजुरीनंतर वनविभागाला अदा करण्यात आले. त्यानंतरच वाहतूक करणे व लागवड करणे या कामाकरीता सिएसटीपीसए कडून दोन कामाचे कंत्राट काढण्यात कार्यदेश क्र. CSTPS/४५०००९६०३५ दि ०२.०७.२०१८ व रु. ३.४५ लाख किंमतीचा कंत्राट में श्रीराम एंटरप्राईजेस, चंद्रपूर यांना देण्यात आले व कार्यादेश क. CSTPS/४५०००९६०३३ दि. ०२.०७.२०१८ ३ लाख किमतीचा कार्यदेश में हनुमान काकडे, चंद्रपूर यांना देण्यात आले त्यावर एकुण रु. ६.९० लाखाचे काम दि.१०.०७२०१८ ला सुरु केले आणि दि. ०१.०८.२०१८ ला पूर्ण झाले.

वृक्ष देखभाल करण्याच्या कामाने कार्यादेश क्र ४५००१००२९६. दि. २१.१:२०१८ में श्रीराम एंटरप्राईजेस, चंद्रपुर यांना मिळाले. कामाची रक्कम रु. १३,०६,३०५रु. होती व काम कालावधी १२ महिने होता हे काम दि. १६ डिसें २०१९ ला संपले त्यानतर वृक्षारोपन परिसरात गाई म्हशीपासून संरक्षण करण्याकरीता परिसर सभोवती कुंपन काम घेण्यात आले हे काम मे. श्रीराम एंटरप्राईजेस, चंद्रपूर यांना मिळाले व कामाचा कालावधी सहा महिने होता. व दि. १२.०७.२०२० को संपला. कामाची कार्यदिश रक्कम रु.१६:२० होती. त्यानंतर वृक्ष लागवडीचे देखभाली करिता नविन कार्यदिश में श्रीराम एंटरप्राईजेस, चंद्रपूर यांना मिळाले. कार्यादेश क्र. ४५५०००४६३०, दि. १३.०७.२०२० कामाची १२.७२ लक्ष होती व काम करण्याचा कालावधी १२ महिणे होता हे काम २३.०७.२०२१ ला संपले. वरिल दिलेल्या कार्यदिश कालावधीमध्ये केलेल्या वृक्षारोपन बऱ्याच प्रमाणे जिवंत नव्हते कारण कंत्राटदराने त्याची देखभाल बरोबर केली नाही. जिवंत वृक्षांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे, कंत्राटदाराला कार्यदिश क ४५५०००४६३०, १३.०७.२०२० दि. या कायदिशामधील अंतिम देशाद्वारे रु. ९५.४३६/५० इतका दंड वृक्ष लागवडीचे देखभाल व्यवस्थित न केल्या प्रकरणी आकारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here