प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-
कोरपना येथे दर्गाह कमेटी व जनसत्याग्रह संघटनेच्या कार्यकत्यांनी मानवतेच्या दुष्टीकोनातुन भोजनदान व्यवस्था सुरु केल्याने अडचणीत असलेले मजुर व काही ठिकाणी होत असलेली उपासमार थांबली आहे. पायपिट करुण आलेल्या मजुराना १० दिवसा पासुन भोजन व्यवस्था केल्याने आबीद अली यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात असून त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक मजुराना सुविधा उपलब्ध झाल्या आहे, तहसिलदार महेन्द्र वेलेकर मुख्यधिकारी अश्विनी गायकवाड ठानेदार, अरूण. गुरनुले इत्यादीच्या समन्वयातुन ते मदत करीत आहे तहसीलदार यांनी शहरात गर्दी वाढु नये म्हणून आहे त्या ठिकाणीच भोजन व्यवस्था करण्यासाठी वाहन उपलब्ध करीत मंडळ अधिकारी व तलाठी यांना नियुक्त केल्याने जनसत्याग्रह संघटनेच्या कॉल करा व भोजन उपलब्ध करूण देऊ हा प्रयोग यशस्वी होत असल्याने सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे