Home भद्रावती ब्रेकिंग न्यूज :-भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई, गुळाची दारू बनविताना भट्टी पकडली, आरोपी...

ब्रेकिंग न्यूज :-भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई, गुळाची दारू बनविताना भट्टी पकडली, आरोपी मात्र फरार ?

भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत गुळाच्या दारू भट्टीवर मोठी कारवाई ! 

भद्रावती प्रतिनिधी उमेश कांबळे :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा लॉक डाऊन असल्याने देशी विदेशी दारूची आयात कुठल्याही शहरात होतं नसल्याने मैद्यप्रेमींसाठी मौवा दारू किंवा गुळापासून हातभट्टीवर बनवलेली दारू आता पर्वणी ठरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणांत जिल्ह्यात मौवा आणि गुळाची दारू तय्यार करण्याची मोहीम जोरात असतांनाच नुकत्याच रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत लौहारा, घंटाचौकी आणि चीचपल्ली येथे लाखों रुपयाची मौवा दारू दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडली असतांनाच आता भद्रावती पोलिसांनी सुद्धा बरान्ज तांडा येथील झुडपी जंगलाचा आधार घेत गुळापासून दारू मोठ्या प्रमाणात तयार करीत असल्याच्या पोलिस खबरीच्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता २६ मोठे प्लास्टिकच्या ड्रममधे गावठी दारू बनविण्याचे जुगाड सुरू होते. ते पोलिसांनी रंगेहाथ पकडले.ही कारवाई दिनांक ०७/०४/२०
रोजी १८:१० वाजता पो स्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडून खबर मिळाली की काही इसम हे बरांज तांडा ते बोनथळा रोडचे बाजूला असलेल्या वीटभट्टी चे मागे झुडपी जंगलात भट्टी लावून गुळ दारू गाळीत आहेत तसेच त्याठिकाणी गुळ सडव्याचे ड्रम जमिनीत गाडून ठेवले आहेत.
सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि तुळजेवार, ठाकूर, पो ह ७१०, ना पो शि १४१९ पो शि १०४०,२८१४,१४४६ यांनी सदर ठिकाणी धाड मारली असता त्याठिकाणी २६ मोठे प्लास्टिक चे ड्रम मिळून आले.प्रत्येक ड्रम मध्ये २०० लिटर गुळ सडवा असा एकूण ५२०० लिटर गुळ सडवा किंमत २००/-रुपये प्रतिलिटर प्रमाणे १०,४०,०००/-रुपये व २६ प्लास्टिक चे ड्रम किंमत प्रत्येकी १०००/-रुपये असे एकूण २६,०००/- रुपये चा मुद्देमाल एकूण किंमत १०,६६,०००/-रुपये मिळून आला.
दोन पंचा समक्ष सविस्तर पंचनामा करण्यात आला व १०० मि लि गुळ सडवा सील करीत मुकरर केले व उर्वरित गुळ सडवा व प्लॅस्टिक ड्रम मोक्यावर पंचा समक्ष नाश करण्यात आले.
सदर बाबत भद्रावती पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी चे विरोधात अप क्र १६४/२० कलम ६५(फ) म दा का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
Previous articleमहाराष्ट्रासाठी मोठी बातमी:-सर्वाधिक वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याच्या यादीत महाराष्ट्राचे प्रमाण केवळ ४,४,
Next articleखळबळजनक :-राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार; मुंबईच्या हॉटस्पॉटमध्ये कहर, 5 मृत्यू,तर पुण्यात 3 लोकांचा मृत्यू,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here