दुर्लक्षित असलेल्या गरीब वस्तीतील परिवाराना पहिल्यांदाच मोफत मोफत भाजीपाला !
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात अती मागास असलेल्या टेमुर्डा एकता नगर हा दुर्लक्षित असल्यामुळे जवळपास येथील.गरीब 71 कुटुंबातील नागरिकांना. छोटूभाई मित्र परिवार तर्फे ५००. किलो भाजीपाला चे वितरण करण्यात आले. दिनांक ७ एप्रिल रोजी टेमुर्डा गावाला असलेले एकता नगर येथे गोट्याच्या खदानी वर काम करणारे छत्तीसगढी आदिवासी समाजाचे ७१.कुटुंब राहत असून तेथील काही नागरिकांनी मागणी केल्यानुसार. छोटूभाई मित्र परिवार तर्फे छोटू भाई सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा, नितीन भांडेकर, वीक्की भोयर, राहुल भोयर, योगेश थोरात, योगेश कोडापे, विनोद कुंभारे, बंडू कुंभारे, विजय कोहळे, बाबा खंडाळकर, शेषराव भोयर, मुन्ना पाठक, आकाश पाठक, संतोष मेश्राम, या सर्वांनी एकता नगरला जाऊन सर्व नागरिकांना भाजीपाल्याचे वितरण केले व तसेच ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा लोकांना अर्ज अन्नधान्य मिळण्याकरिता वितरित केले तरी सर्वांना आव्हान आहे की आपल्या परिसरातील गोरगरीब नागरिकांना मदत करून त्यांना सहकार्य करावे असे आव्हान छोटूभाई शेख यांनी करून जनसेवा हीच खरी ईश्वर आणि अल्लाची सेवा आहे असेही छोटूभाई शेख यांनी म्हटले आहे.