Home वरोरा जबरदस्त :-वरोरा येथील शिक्षक करताय लॉक डाऊन च्या सुट्टीचा सदुपयोग!

जबरदस्त :-वरोरा येथील शिक्षक करताय लॉक डाऊन च्या सुट्टीचा सदुपयोग!

पोलिसांच्या रोटी अभियानात बाजावताय महत्वाची भूमिका !

वरोरा प्रतिनिधी :-

शिक्षक समाजाला दिशा देणार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाते शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी.या सर्व गोष्टींचा प्रत्यय येत आहे तो या लॉक डाऊन च्या काळात वरोरा तालुक्यातील शिक्षकांकडून केल्या जात असलेल्या सुट्टीच्या सदुपयोगाच्या माध्यमातून .
वरोरा पोलीस स्टेशन चे परी सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील गरजू नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याच्या या मोहिमेची सुरवात 1मार्च पासून झाली .आदी चार शिक्षकांना सोबत घेऊन सुरू झालेले हे अभियान पाहता पाहता भरपूर नावलोकस येत आहे .दररोज पन्नास हजाराचे अन्नधान्य या मोहिमेच्या माध्यमातून वाटप केल्या जात आहे .या मोहिमेत पारदर्शकता रहावी म्हणून या मोहिमेकरिता सहायक पोलिस अधिकारी सतीश सोनटक्के यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून भरोसा सेलच्या रूम मध्ये या अभियानाचे कार्यालय ही उघडण्यात आले आहे .या कार्यालयाची व आवक जावक रजिस्टर ची जबाबदारी वरोरा येथील शिक्षक गोपाल गुडधे , गजेंद्र गोडे , नगाजी साळवे ,सुभाष देशेवार , गंगाधर बोढे यांच्या वर असून स्वयंसपूर्ती ने त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे .यावे ज्ञानासाठी निघावे सेवे साठी असे प्रत्येक शाळेच्या भिंतींवर लिहिले असतेच पण विद्यार्थ्यांना आपल्या कृतीतून हा संदेश देणारे हे शिक्षक खरचं समाजासमोर एक आदर्श ठरत आहेत.यात शिक्षक संघटना ही मदतीसाठी समोर सरसावल्या असून क्रास्टाईब शिक्षक संघटना , पुरोगामी प्रा .शिक्षक समिती , अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्नधान्याची व्यवस्था करून देत या अभियानास सहकार्य केले.यशस्वी व पारदर्शी ठरलेल्या या अभियानास शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा असून या निमित्याने शिक्षकांची सामाजिक बांधिलकी प्रकट झाली .

Previous articleखतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय!
Next articleसंतापजनक :-तलावातुन मासे चोरी पडली महागात गुन्हा दाखल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here