Home कोरपणा खळबळजनक :-गडचांदूर पोलिसांच्या भ्रष्ट नियतीमुळे “तेलंगानातील” दारूची संचारबंदीतही गडचांदूरात विक्री

खळबळजनक :-गडचांदूर पोलिसांच्या भ्रष्ट नियतीमुळे “तेलंगानातील” दारूची संचारबंदीतही गडचांदूरात विक्री

तेलंगणा राज्यातून दारूचा मोठा साठा गडचांदूरात !तळीरामांनी घेतला दारूचा आनंद !

गडचांदूर प्रतिनिधी :-

मागील अनेक दिवसापासून तळीरामांनी मोहफूल आणि गुळापासून बनविलेल्या दारूचा आस्वाद घेतला होता मात्र गुरुवार दिनांक 6 मे रोजी गडचांदुर मधील मद्य शौकिन “तर्र” झालेत. कारण संचारबंदी नंतर पहिल्यांदाच गडचांदूर मध्ये तेलंगाना येथील विदेशी दारूचा  मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला. या दारूची शहरातील मुख्य ठिकाणी  विक्री झाल्याने तळीरामांची जणू जत्रा भरली होती. आपल्या शहरात दारू आली याची जसजशी ही माहिती मिळाली तसतशी त्या ठिकाणी गर्दी जमा होऊ लागली, महत्वाचे म्हणजे गडचांदूर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर नेहमीच्या ठिकाणांवर ही दारू विक्री होते तर गडचांदूर पोलिस अधिकारी नेमके काय करताहेत ? हे न समजणारे कोडे असून ज्याअर्थी  विरूर पोलिसांनी नुकताच  तेलंगाना येथून येणारा दहा लाखाचा सुगंधित तंबाखू पकडून  कारवाई केली तशी कारवाई  गडचांदूर पोलिस अवैध दारू माफियावर का करू शकले नाही ?

महत्वाची गंभीर बाब म्हणजे  फक्त एकाच  भागात नाही तर प्रभाग क्रमांक 8, प्रभाग 4 आदि भागात सुद्धा अवैध दारू विक्री  पुर्वी ज्या ठिकाणी विदेशी दारू मिळायची त्याठिकाणी सुरू होती. अगोदरच गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक पैनगंगा कोळसा चोरी प्रकरण व कैलास नगर येथील बार मालकाला दारूच्या अवैध वाहतूक प्रकरणी त्यांच्या  कडून लाखो रुपये घेतल्याच्या चर्चेमुळे प्रसारमाध्यमांच्या रडारवर असल्याने आता ह्या अवैध दारू विक्री प्रकरणात गडचांदूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी त्वरित या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Previous articleधक्कादायक :- विदर्भातील सर्वात मोठी रेती तस्करी भद्रावती तालुक्यातून ?
Next articleदखलपात्र :- अखेर रेती माफिया वासुदेव ठाकरे यांच्या रेती साठ्यावर उपविभागीय अधिकारी यांची जब्ती ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here