Home वरोरा धक्कादायक :- गिट्टि खदाणीतील पाण्यात डुबुन अनुश ठाकरे या ७ वर्षीय बालकाचा...

धक्कादायक :- गिट्टि खदाणीतील पाण्यात डुबुन अनुश ठाकरे या ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू !

चरूर खटी मधील या गिट्टि क्रशर खदाणीच्या पाण्यात पडून आजपर्यंत पाच जणांचा म्रूतू ! गिट्टि क्रशर मालकांवर कारवाई करण्याची मागणी,

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील चरूरखटी या गावातील शिवारात जवळपास ३० वर्षापासून ४० एकरमधील गिट्टि क्रशर च्या खदाणी असून त्या खदाणी चे खड्डे ३० ते ३५ फूट असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. या खड्ड्यात पडून अनुश ठाकरे नावाचा ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी म्रूतू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
किरण ठाकरे यांच्या शेता शेजारीच हया गिट्टि खदाणी असल्याने दिनांक १५ मे ला सायंकाळ च्या वेळेस त्यांचा मुलगा अनुश हा कधी शेतात आला हे त्यांना कळले नसतांना अचानक मृतकाचे वडील शेतात बैलबंडीत माती भरून गेले.आणि माती खाली करून बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता, काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मृतकाचे वडील पाणी असलेल्या खडुयाकडे वळले तर मृतक विद्यार्थी बालक 30 फूट खड्डयात पडल्याचे लक्षात आले आणि त्यातच तो मरण पावला.
ही घटना 15 मे ला सायंकाळी 6.00 वाजताचे सुमारास घडली.
रात्रो 11.30 ला ग्रामस्थांच्या सहकार्यांनी बालकाचा मृत्यू देह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. मृतक बालकांचे वडील,आजोबा ,शेतीकामात असतांना मृतक बालक शेतात आले हे कुणालाही माहीत नव्हते . बालक शेतात आला आणि नकळत खड्ड्यात पडून पाण्यात बुडून त्याचा करुण अंत झाला यामुळे चरूरखटी गावात शोककळा पसरली आणि सर्वानी हळहळ व्यक्त केली मात्र गिट्टि खदाणीतील खड्ड्यात पडून आजपर्यंत पाच व्यक्तींचा म्रूतू झाल्याने हे खड्डे जीवघेने ठरत असल्याने या गिट्टि क्रशर मालकांवर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here