Home चंद्रपूर आनंदाची बातमी ;- चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनच्या मार्गावर ?कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव...

आनंदाची बातमी ;- चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनच्या मार्गावर ?कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह!

अखेर भुमीपुत्राची हाक ची बातमी खरी ठरली ! दुसरा पॉझिटिव्ह रुग्णाची रिपोर्ट सुद्धा लवकरच निगेटिव्ह येण्याच्या मार्गावर ?

चंद्रपूर प्रतिनिधी : –

चंद्रपूर जिल्ह्यातील 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या कृष्ण नगर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संदर्भात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर बातमी प्रकाशित करतांना त्या रुग्णांच्या परिवारातील सदस्य निगेटिव्ह असल्याने त्या पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह येणार असे भाकीत केले होते आणि आता ही बाब स्पष्ट झाली असून भुमीपीत्राची हाक न्यूज पोर्टल ची बातमी खरी ठरली आहे. 16 मे रोजी घेतलेला त्या  कृष्ण नगरमधील नागपूर येथे भरती असलेल्या रुग्णांचा रिपोर्ट अखेर निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला असल्याने भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल ची बातमी खरी ठरली आहे. हया रुग्णाचा पुन्हा 17 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला आहे . हा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे. आता बिनबा गेट परिसरातील त्या पॉझिटिव्ह मुलीचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह येईल अशी शक्यता असल्याने चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनच्या मार्गावर आहे

2 मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्ण नगर येथील सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या नागरिकाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चंद्रपूर शहरातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ठरला. त्यानंतर या रुग्णाला कोविड शिवाय अन्य आजाराच्या पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. 14 दिवसांच्या निगरानी कालावधीनंतर पुन्हा या रुग्णाचे 16 मे रोजी स्वॅब घेण्यात आले. हा नमुना निगेटिव्ह आला आहे. तसेच 17 मे रोजी आणखी एक स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. उद्यापर्यंत याबाबतचा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास हा रुग्ण कोरोना मुक्त झाला, असे समजले जाऊ शकते. त्यामुळे आणखी एका अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

३४ पोलिसांचे स्वॅब तपासणीला !

दरम्यान चेक पोस्टवर काम करणाऱ्या पोलीस दलातील जवानांचे स्वॅब घेण्याची मोहीम जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुरू केली आहे. कालपर्यंत अति जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या 6 पोलीस जवानांचे स्वॅब घेण्यात आले होते. काल पुन्हा 34 जणांचे स्वॅब घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 40 पोलीस जवानांचे स्वब घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here