Home वरोरा कारवाई :- कोटबाळा येथे सुभाष लालसरे  चालवीत असलेल्या दुकानाचा परवाना रद्द करा...

कारवाई :- कोटबाळा येथे सुभाष लालसरे  चालवीत असलेल्या दुकानाचा परवाना रद्द करा – गावकऱ्यांची मागणी !

नायब तहसीलदारांनी केली प्रत्यक्ष पाहणी वरिष्ठांकडे रिपोर्ट सादर.  गावकरी यांना कारवाईची अपेक्षा !

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील कोटबाळा गावातील सरकारी स्वस्त धान्य दुकानात कमी अन्नधान्य वाटप करून सुभाष लालसरे हे भ्रष्टाचार करीत असल्याने गावकरी संतप्त झाले होते व त्यांनी तहसीलदार वरोरा यांच्याकडे तक्रार देवून हया स्वस्त धान्य चालविणाऱ्या सुभाष लालसरे यांच्यावर कारवाई करून दुकानदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती.
हे कोटबाळा येतील स्वस्त धान्य दुकानाचे राशनचे वाटप एका महिला बचत गटामार्फत केले जात असून त्या वाटप गटाचे सचिव संगीता दिलीप लालसरे हया खऱ्या अर्थाने चालक असतांना हे दुकान सुभाष शिवराम लालसरे (ग्राम पंचायत सदस्य )यांच्या मार्फत चालवल्या जात आहे. देशात आलेल्या महामारी वर मदत म्हणून प्रति युनिट पाच किलो तांदूळ वाटप करण्याचे राज्य सरकाचे आदेश असून त्या आदेशाचे पालन न करता कोटबाळा येथील राशन दुकानदार यांनी प्रती युनिट चार किलो तांदूळ वाटप केले आहे अशी चर्चा होती त्यामुळे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातमी प्रकाशित झाली होती, त्या बातम्यांची दखल घेवून नायब तहसीलदार चौधरी यांनी कोटबाळा येथे जावून प्रत्यक्ष पाहणी करून गावकरी ग्राहकांचे बयान नोंदविले आहे आता ही रिपोर्ट चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे जाणार असून या प्रकरणी सुभाष लालसरे यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्या बचत गटाचा परवाना रद्द होईल का ? याबद्दल शंका कुशंका निर्माण होतं असल्याने गावकऱ्यांनी आता कारवाई झालीच पाहिजे यासाठी कंबर कसली असल्याची माहीती आहे .

Previous articleसंतापजनक :- एका डॉक्टरचे अश्लील चाळे बनला चर्चेचा विषय ! त्यानंतरही आपत्तिजनक विडिओ असल्याची शंका ?
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या झाली १५ च्या वर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here