Home वरोरा प्रेरणादायी :- माणुसकीचा धर्म जोपासुन छोटूभाई यांनी स्वखर्चाने एका अज्ञात व्यक्तीचा केला...

प्रेरणादायी :- माणुसकीचा धर्म जोपासुन छोटूभाई यांनी स्वखर्चाने एका अज्ञात व्यक्तीचा केला अंतिम संस्कार

अनेक दिवसापासून उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना अज्ञात व्यक्तीचा काल झाला होता म्रुतु !

वरोरा प्रतिनिधी :-
शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावाजवळ काही दिवसापूर्वी अनोळखी इसम जखमी अवस्थेत पोलिसांना मिळाला होता ही माहीती वरोरा पोलिसांना मिलताच त्यांनी त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात केले होते मात्र त्या दरम्यान पोलिसांनी सगळीकडे ही माहीती वायरलेस द्वारे व इतर माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचवली परंतु त्याच्या कुठल्याही नातेवाईकांना ही माहीती गेली नव्हती व त्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. सादर व्यक्ती अनोळखी असल्याने व त्याचे कुणी नातेवाईक नसल्याने त्याचा अंतिम संस्कार करणार कोण ? हा प्रश्न होता मात्र वरोरा शहरात व तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर व दिन दलित शोषित पीडितांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असणाऱ्या छोटूभाई शेख जे वरोरा नगरपरिषद चे बांधकाम सभापती आहे त्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने त्या अज्ञात व्यक्तीच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलला आणि दिनांक 23 मे.ला. दुपारी 2 वाजता. वणी नाका चौकाजवळील समशान भूमीमधे अंतिम संस्कार दफन विधी पार पाडला, यावेळी स्वतः सार्वजनिक बांधकाम सभापती तथा काँग्रेस असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष छोटू भाई शेख पत्रकार आलोक रठ्ठे, पोलीस कर्मचारी टिपले, मेश्राम. आकाश पाठक, गोलू ड्रायव्हर, घोटकर सफाई कामगार व इतर सहकार्य करणारे व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहून अंतिम विधीस सहकार्य केले.
जात धर्म पंथ या पलीकडे जावून मानवी मूल्य जपणाऱ्या छोटूभाई शेख सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज असून दुखात संकटात आणि अडिअडचणित नेहमीच जनेतेचा आवाज ठरलेल्या छोटूभाईनी अज्ञात व्यक्तीच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलून म्रूतकाच्या आत्म्याला शांती मिळाली आणि सोबतच समाजाला एक प्रकारे प्रेरणा मिळाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यात सकाळीच चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ !
Next articleसनसनिखेज :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी २१ वर पोहचली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here