Home वरोरा दखलपात्र :- स्वतः ईद साजरी न करता गरीब मुस्लिम परिवाराला ईद चे...

दखलपात्र :- स्वतः ईद साजरी न करता गरीब मुस्लिम परिवाराला ईद चे साहित्य वाटप करून छोटूभाईचा अनोखा उपक्रम !

कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात ईद साजरी करण्यास पैसा नसलेल्या मुस्लिम कुटुंबीयांना छोटूभाई शेख यांचा आधार !

लक्षवेधक:-

खरं तर संपूर्ण विश्व कोरोना महामारीच्या संकटात आपल्या सण आणि उत्सवात सुद्धा दुःखी आणि चिंताग्रस्त आहे. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो की ख्रिच्चन असो सर्वच धर्माच्या सणाला आणि उत्सवाला जणू ग्रहण लागले आहे कारण दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना सगळा समाज भयभीत झाला आहे. अशा स्थितीत ज्या गोरगरीब जनतेला या लॉकडाऊन च्या काळात अन्नधान्य पुरवठा असो की इतर मदत असो वरोरा नगरपरिषद चे बांधकाम सभापती तथा काँग्रेस असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष छोटूभाई शेख यांनी अशा गोरगरीब जनतेला आपल्या स्वखर्चाने मदतीचा हात दिला आहे.
छोटूभाई शेख हे केवळ लॉक डाऊनचा काळ आहे म्हणूनच सक्रिय झाले असे नाही तर त्यांच्या कार्यालयात आणि घरी नेहमीच गोरगरीब लोक मदतीसाठी येतात, त्यामुळे त्यांचे कार्यालय म्हणजे जणू आमदार खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालया सारखे लोकांच्या उपस्थितीने गजबजले असते. अशातच आता मुस्लिम समाजाची ईद आली असतांना गरीब मुस्लिम परिवाराच्या हातचे काम लॉक डाऊन च्या काळात हरविल्याने त्यांच्याकडे ईद साजरी करण्यासाठी पैसा नाही म्हणून छोटूभाई शेख यांनी शेकडो अत्यंत गरीब मुस्लिम परिवाराचा शोध घेवून ईद हा सण साजरा करण्यासाठी जे साहित्य लागते ते सर्व साहित्य त्यांनी किट बनवून वाटप केले. अर्थात त्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की यावेळी मी माझ्या घरी ईद साजरी न करता गोरगरीब मुस्लिम कुटुंबीयांना ईद चे साहित्य वाटप करून त्यातच माझी ईद साजरी केल्याचा आनंद मिळविण आणि अखेर त्यांनी आपल्या हया उपक्रमाची सांगता केली आणि शेकडो मुस्लिम परिवाराच्या घरी ईद चा आनंद निर्माण केला.त्यामुळे छोटूभाईच्या हया अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

Previous articleसनसनिखेज :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी २१ वर पोहचली !
Next articleखबरदार :-बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन बंधनकारक, कॉरेन्टाइन रुग्ण बाहेर फिरतांना दिसल्यास डायल करा 1077

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here