Home कोरपणा कोरपना पोलिस स्टेशन मार्फत टू व्हीलर पकडण्याची  मोहीम तेज ! 

कोरपना पोलिस स्टेशन मार्फत टू व्हीलर पकडण्याची  मोहीम तेज ! 

विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींच्या जवळपास ४० ते ५० दोन चाकी गाड्या पकडल्या ! 

प्रमोद गिरट्कर कोरपना प्रतिनिधी :-

सध्या देशात कोरोना महामारीचे  संकट ओढावत असतांना संचारबंदी लावून सुद्धा जनता घरात रहायला तयार नसल्याने पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. कोरपना पोलीस स्टेशन मार्फत यासाठी कड़क बंदोबस्त ठेवन्यात आला आहे मात्र तरीही कोरपना व बाहेरील टू व्हीलर 40 ते 50 टू व्हीलर बेकायदेशीर संचारबंदीचे उल्लंघन करीत असल्याने त्या गाड्यांना पकडण्यात आले. व कारवाई करण्यात आली. या प्रसंगि कोरपना चे ठानेदार व ट्राफिक पोलिस यानी अतिशय चतुराईने कारवाई करून जनतेला एक प्रकारचा घरी राहण्याचा संदेश दिला आहे. यामुळे आता कोरपना व बाहेर गावातील लोकाना घराबाहेर निघायला भिती निर्माण  झाली आणि  कोरोना व्हायरस कोणाला  होऊ नये, या साठी कोरपना चे ठानेदार अरुण गुरनूले यानी दिवस रात्र क़ुठेही गर्दी होऊ नये, याची दखल घेतली आहे. या प्रसगी कोरपन्याचे ठानेदार व ट्राफिक पोलिस तसेच पोलिस स्टेशन चे कर्मचारी यानी दमदार अमलबजावनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here