Home कोरपणा धोपटाळा येथे तीन गोठे जळून खाक शेतकऱ्यांचे कापूस व जनावरे जळून भस्म...

धोपटाळा येथे तीन गोठे जळून खाक शेतकऱ्यांचे कापूस व जनावरे जळून भस्म !

बोबडे परिवाराचे लाखोंचे नुकसान!

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी:-

कोरपना येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धोपटाळा या गावी आज अकरा वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे जनावराचा चाऱ्याला आग लागल्यामुळे गोठ्यामध्ये असलेले दोन म्हशीचे वघार, आणि चार वासरे, बकरीचे तीन नग,दोन मोटार सायकल व शाळेत मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणारी सायकल व कापूस विक्रीसाठी आवरात ठेवलेल्या 3 बंडी मध्ये भरलेला कापूस अंदाजे 25 क्विंटल कापुस जळून भस्म झाला. धोपटाळा येथील मनोहर बोबडे, मुरलीधर बोबडे, दशरथ बोबडे, दिवाकर बोबडे, विजय बोबडे या बोबडे परिवाराची सर्व मालमत्ता जळून भस्म झाली असून जनावरे व बकऱ्यांची सुद्धा जीव हानी झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात बोबडे परिवाराचे लाखोंचे नुकसान झाले असून या वेळी गावकऱ्यांनी महिला पुरुष एकत्र येऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे विझवण्याचा प्रयत्न करण्यात लवकर यश आले नाही. काही वेळाने अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी तर्फे अग्निशामक पथक पोहोचल्यामुळे आग विझवण्यात यश आले.यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी कोरपण्याचे ठाणेदार अरुण गुरुनुले, तलाठी देठे, व सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष अाबीदअली उपस्थित होऊन जळलेल्या नुकसानीची शेतकर्‍यांना शासनाकडून मदत देण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे आव्हान करण्यात आले . शेतीच्या हंगामात हातात असलेला कापूस जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या वेळी पोलीस पाटील माणिकराव कुचनकर तसेच तेजराव भोयर, विलासराव राऊत काशिनाथ पाचभाई या गावातील युवक व महिलांनी आज विझवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here