Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- घुग्घुस येथे रेड झोन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यातील आलेल्या...

ब्रेकिंग न्यूज :- घुग्घुस येथे रेड झोन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यातील आलेल्या 16 जणांवर गुन्हे दाखल,

घूग्गूस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या सतर्कतेमुळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकडकर यांच्या निरीक्षणाखाली सर्वांना केले कोरोनटाईन !

घूग्गूस प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोन मधे असून जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, विशेष म्हणजे जिल्ह्याचे जिलाधिकारी डॉ.कुणाल खेमनार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहेश्वर रेड्डी यांच्या संयुक्त प्रयत्नाने व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला नाही पण घुग्घुस येथे रेड झोन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यातील तब्बल 16 लोकांनी प्रवेश केल्याने, तसेच काही लोक विनापरवानगी इथे दाखल झाल्याने घूग्गूस परीसरात नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र घूग्गूस पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने त्या १६ लोकांना त्यांच्या घरून ताब्यात घेवून वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकडकर यांच्या वैद्यकीय टीम च्या हवाली केले व त्या सर्वांची टेस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या आरोग्य तपासणी नंतर त्यांना कोरोनटाईन केले.

कोरोना संसर्गाबाबत तीन झोन करण्यात आले असून चंद्रपूर जिह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने हा जिल्हा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अर्थातच या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे (रेड आणि ऑरेंज) अशा जिल्ह्यातील लोकांना या जिल्ह्यात प्रवेशबंदी आहे. ज्यांना या जिल्ह्यात यायचे आहे त्यांना अत्यावश्यक पास प्रशासनाकडून दिला जातो. मात्र असे असतानाही कोरोनाग्रस्त रेड व ऑरेंज झोन जिल्ह्यातील तब्बल 16 जण घूग्गूस येथे दाखल झाले होते, विशेष म्हणजे यापैकी कुठल्याही नागरिकांकडे हा पास नव्हता शिवाय यापैकी रेड झोन मधील पुणे येथून 2, नागपुर 3, तर ऑरेंज झोन मधील अहमदनगर 5, अमरावती 3, अकोला 2 आणि यवतमाळ येथून 1 व्यक्ती घुग्घुस येथे आलेले आहेत. त्यांच्या हातावर होम कोरोन्टीन असल्याचा शिक्का सुद्धा मारलेला नाही त्यामुळे ही बाब गंभीर असल्याने काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब प्राथमिक केंद्राच्या लक्षात आणून दिली. व पोलिसांना सुद्धा यानंतर माहिती दिली त्यामुळे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी तत्काळ या १६ ही लोकांना ताब्यात घेवून त्यांना आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडकर यांचेकडे पाठवले व त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर होम कोरोनटाईन चा शिक्का सुद्धा मारण्यात आला, पण एवढे सगळे १६ व्यक्ती कोणत्या कोणत्या मार्गाने आले आणि त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेता कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्या १६ व्यक्तीवर आईपीसी कलम १८८ महामारी कायदा १८९७ च्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. आता ते सर्व होम कोरोनटाईन मधे असून डॉ. वाकडकर यांच्या निगरानीमधे असल्याचे सांगण्यात येत आहे.

चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी अगोदरच यवतमाळ जिल्ह्यातून वेकोलि कर्मचारी येत असून आपले वेकोलि कर्मचारी तिथे जात असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा व आपल्या जिल्ह्याच्या सिमा सुरक्षित ठेवाव्या अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र आता तर घूग्गूस मधे एवढे लोकं रेड व ऑरेंज झोनमधून आल्याने मोठी चिंता प्रशासनाला झाली आहे. परंतु  प्रशासनाने आपली भूमिका नीट वाजवून पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने या १६ ही लोकांवर कारवाई करून त्यांना कोरोनटाईन करण्यात आल्याने घूग्गूस परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Previous articleब्रेकिंग न्यूज :-एबीपी माझा ची ती बातमी चंद्रपूरची नव्हे ? चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही !
Next articleवरोरा येथील समाजसेविका योगीता लांडगे यांचा कोरोना लॉकडाऊन मधे अनोखा उपक्रम !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here