Home Breaking News आनंदाची बातमी:- ग्रीन व ऑरेंज झोन मधील जिल्ह्यात सुरू होणार ऊद्दोगधंदे, मात्र...

आनंदाची बातमी:- ग्रीन व ऑरेंज झोन मधील जिल्ह्यात सुरू होणार ऊद्दोगधंदे, मात्र ३ मे पर्यंत जिल्हाबंदी कायम !

३ मे पर्यंत हे बंधन आपल्याला पाळायचं आहे,’  उद्धव ठाकरे यांच जनतेला आव्हान !

कोरोना अपडेट :-

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करत नवी माहिती देवून आवाहनंही केलं आहे. महाराष्ट्रात अर्थचक्र फिरायला हवं. त्यामुळे 20 तारखेपासून काही प्रमाणात परवानगी मिळेल. काही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. काही ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. आपण झोन केलेले आहेत…रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन केले आहेत.ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांतील उद्योगांना परवानगी देणार,’ अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणार असाल तर आम्ही धान्य पुरवू. आता मला कोणताच धोका पत्कारायचा नाही. काहीही न करता शांत राहाणं ही मोठी शिक्षा…पण आपण ते करतोय. पण हळूहळू शिथिलता आणणार मुभा देत आहोत…शेती, जीवनावश्यक गोष्टी याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी आपण उघडणार नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच वाहतुकीला परवानगी. 3 मे पर्यंत हे बंधन आपल्याला पाळायचं आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

*उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे :*

– शत्रू समोर असेल तर हिंदुस्थानी बांधवांनी त्याचा कधीच नायनाट केला असता, पण हा कोरोनाचा शत्रू दिसत नाही

– पण तरीही आपण सर्वांनी एक पराक्रमच केला आहे…कारण आपण ही लढाई संयमाने लढतोय

– आपण आतापर्यंत कोरोनाच्या 66 हजारांहून अधिक टेस्ट केल्या आहेत..त्यातील 95 टक्के लोक निगेटिव्ह निघाले

– कोरोना प्रादुर्भाव झालेल्या 350 हून अधिक जणांना बरं केलं

– सध्या 52 रुग्ण गंभीर कॅटगरीत मोडणारे आहेत

– काहीवेळा शेवटच्या टप्प्यात रुग्ण डॉक्टरकडे पोहोचतो

– सर्दी-खोकला-ताप हे लक्षण दिसल्यास लपवू नका

– आपण क्युअर क्लिनिक सुरू केले आहेत

– कोरोना झाला तरी संपलं, असं नाही

– आपले डॉक्टर कुठेही लढायला कमी नाहीत

– काही प्रमाणात उपकरणांचा पुरवठा होत आहे

– 80 टक्के लोकांपर्यंत राशन पोहोचवलं आहे

– केंद्रही आपल्याला मदत करत आहे

– केंद्र सरकार मोफत धान्य देतंय…पण त्यात फक्त तांदूळ आहे

– आकडे कमी होत असले तरीही आपण भ्रमात राहायला नको….

– गाफील राहून चालणार नाही

तीन झोननुसार जिल्ह्यांची विभागणी

राज्यात रेड झोनमध्ये 8 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.

ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेल्या जवळपास 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे आहेत.

*Amazon, Flipkart वरून ‘या’ वस्तूंच्या पुरवठ्यावर निर्बंध, गृह मंत्रालयाचे आदेश*

आतापर्यंत कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 9 असे जिल्हे आहेत जिथं अजुन कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. यामध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत.

मुंबई ही कोरोनाचा हॉटस्पॉट

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्याची राजधानी मुंबई ही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. कारण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या रोगाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण समोर न आल्यास त्यांच्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोरोनाच्या चाचण्या (corona testing) वाढवल्या आहेत.

Previous articleब्रेकिंग न्यूज :-बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीसह पत्रकार व वेकोली अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल ?
Next articleकाळाची गरज ओळखून नागपूर शहरात रेल्वेचे एक अद्यावत मध्यवर्ती रूग्णालय व विद्यालय बांधा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here