शहरात लॉक डाऊन पासून 1 हजार 299 जणांना होम कवारंटाईन?
भद्रावती उमेश कांबळे :-
गेल्या दहा दिवसात ठाणे मुंबई व इतर ठिकाणांवरून भद्रावती शहरात दाखल झालेल्या आठ जणांना स्थानिक प्रशासनाने दोन ठिकाणी कवारंटाईन केले आहे शहरात लाकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत बाहेरून शहरात परत आलेल्या भद्रावती शहराच्या नागरिकांना सुद्धा होम कवारंटाईन करण्यात आले आहे, मात्र अद्यापही जिल्हा बंदीला हुलकावणी देत अनेक व्यक्ती बाईकच्या साह्याने कीवा ईतर शक्कल लढवत शहरात दाखल होत असून यापैकी अनेक व्यक्ती आपली ओळख स्थानिक प्रशासनापासून लपवून ठेवत असल्याने शहराची चिंता वाढली आहे. मुळात संताजी नगर येथे राहणारे व नोकरीनिमित्त ठाणे येथे वास्तव्य असलेल्या एका कुटुंबातील 3 व्यक्तीनी ठाणे येथील पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या पत्राच्या साह्याने तब्बल आठशे किलोमीटर प़वास करीत भद्रावती गाठले. मात्र त्यांनी भद्रावती शहरात आल्याची सूचनासुद्धा प्रशासनाला दिली नाही मात्र नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत कळविल्यानंतर त्यांना शहरातील शासकीय विश्रामगृहात कवारंटाईन करण्यात आले आहे. एकीकडे हा प्रकार झाल्यानंतर दि.२२ एप्रिलला दोघांनी चक्क मालगाडी ने प्रवास तर एकाने पायदळ प्रवास करीत भद्रावती गाठले या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांना शहरातील गवराळा परिसरातील भक्तनिवास येते कवारंटाईन करण्यात आले आहे,
जिल्ह्याच्या सीमा बंदोबस्तात स्थितिलता असल्यामुळे बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांमधे दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे, मात्र ही बाब भद्रावती शहराच्या जीवावर उठू शकते, कारण नागपूर शहरातून अनेक जण बाईकच्या साह्याने प्रवास करून व पोलीस बंदोबस्ताला हुलकावणी देत अनेक जण भद्रावती शहरात दाखल होत असल्याची खात्रीलायक माहिती आहे या सर्व व्यक्तींनी पहाटेच्या वेळेस बाईक नीे प्रवास केल्याचे कळते त्यामुळे जिल्हा सीमा सुरक्षा व बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, त्यामुळे येणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याच्या सीमा बंदोबस्ताला अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे, गुन्हा दाखल होण्याच्या भितीपोटी शहरात येणारे हे नागरिक आपली ओळख प़शासनास देत नसल्याचे कळते.