Home चंद्रपूर धक्कादायक :- सिमेंट सह परप्रांतीय कामगार घेवून जाणाऱ्या सचिन जैन या ट्रांसपोर्ट...

धक्कादायक :- सिमेंट सह परप्रांतीय कामगार घेवून जाणाऱ्या सचिन जैन या ट्रांसपोर्ट कंपनीच्या ट्रक ला अपघात !

लॉक डाऊनमधे जिल्हा आणि राज्य नाकाबंदीचा फज्जा !

चंद्रपुर प्रतिनिधी :-

काल गुरूवार दि. 23 एप्रिल रोजी रात्रो साडे आठ च्या दरम्यान तेलंगणा सिमेंट ने भरलेला सचिन जैन ट्रांसपोर्ट कंपनी यांच्या १२ चाकी ट्रक चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट मारुती मंदिराजवळ एका झाडाला ही धडक दिल्यामुळे अपघातग्रस्त झाला ही एवढी जोरदार धडक होती की लोडेड सिमेंट ट्रक रस्त्यावर ९० अंशामध्ये सरळ होऊन कोसळला व गाडीचे केबिन रोडच्या शेजारला असलेल्या झाडामध्ये अक्षरश: आतमध्ये घुसली . या मधे पोलिसांना ट्रकची केबिन सब्बल ने उपसून बाहेर काढली.

मात्र सचिन जैन यांच्या मालकीच्या असलेल्या या ट्रक चा चालक अपघाताचे वेळी दारू च्या नशेमध्ये असल्याची माहीती असून त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. खरं तर नेहमीच्या घटनेप्रमाणे चालक त्या अपघात ठिकाणाहून पसार झाला. या लोडेड ट्रकमध्ये ड्रायव्हर क्लिनर व्यतिरिक्त पाच-सहा मजदूर व एक बालक केबिन मध्ये होते. अपघातानंतर चालक फरार झाला. आत मध्ये असलेले हे मजदूर रक्ताच्या थारोळ्यात मंदिरातील बेंचवर विव्हळत होते. तेलंगाना येथील हे मजूर कुटुंबासहित बाहेर कुठेतरी जात असल्याचे सांगत होते. या चार चाकी ट्रक मध्ये तेलंगाना राज्यातील उत्पादित असलेले बिर्ला-ए-वन कंपनी चे सिमेंट ची वाहतुक होत होते. या अपघातात जखमी कामगार हे तेलंगणा येथून येऊन छत्तीसगढ़ जाणार असल्याचे कळते मात्र तेलंगणा सीमेवर यांची ट्रक तपासली का गेली नाही व जिल्ह्यात नाकाबंदीचा फज्जा असा कसा उडाला ? याची चौकशी व्हायला हवी !

Previous articleसिमेंट वाहतुकीमुळे नागरिकात दहशत अनेक गावात असंतोषाचा भडका.
Next articleखळबळजनक घटना :- एका अल्पवयीन १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here