आरोपी रत्नाकर बोथले या ५५ वर्षीय नराधमाचे दुष्कृत्य !
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहरात बोथले मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चा मालक रत्नाकर बोथले यांनी एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या मेडिकल मधे चैकलेट घेण्यासाठी आल्यानंतर तिचेवर मेडिकल ला लागून असलेल्या रिकाम्या खोलीत घेवून जाऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचेवर वरोरा पोलिस स्टेशन मधे विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या लॉक डाऊन चा काळ असून रस्त्याने फिरणाऱ्या लोकांची संख्या ही नगण्य आहे मात्र याच संधीचा फायदा घेवून रत्नाकर बोथले यांनी आपल्या नातीनच्या वयाच्या बिचाऱ्या निरागस अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने आता विश्वास ठेवायचा तो कुणावर ? हा प्रश्न निर्माण झाला आहे, ही घटना वरोरा येथे तहसील कार्यालय समोर डॉ. जांजुच्या दवाखान्याजवळ घडली असून या घटनेने वरोरा शहरात संताप व्यक्त केल्या जात आहे.