Home वरोरा दुःखद वार्ता :- मनीष टेमुर्डे यांचा दुर्दैवी अपघात  ?

दुःखद वार्ता :- मनीष टेमुर्डे यांचा दुर्दैवी अपघात  ?

खिशातून १६०००/- रुपये झाले गायब  !

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील मोहबाळा येथील मृतक विवाहित युवक विटाचे वसुलीसाठी दिंडोडा गावाला गेला होता.16000 हजार वसुली घेऊन आपल्या दुचाकीने स्वगावी परत येत असताना दुचाकी वाटेत नियंत्रण सुटल्यामुळे तो पडला त्याला अपघातात जबर मार बसल्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला.घटना 23 एप्रिल ला 3.15 चे दरम्यान घडली मतकाचे नाव मनीष रमेश टेमुर्डे वय 30 रा.मोहबाला,ता.वोरा येथील रहिवासी आहे.

मृतक मनीष रमेश टेमुर्डे यांचा वीटभट्टी व्यवसाय होता.ग्राहकांना विटा उधारीवर द्यायचा,ग्राहकाकडील वसुलीसाठी 23 एप्रिलला सकाळी 7.00 वाजता गावावरून निघाला आणि माढेली जवळील दिंदोडा या खेड्यावर गेला.16000 हजार रुपये वसली घेऊन, दुचाकीने मोहबाला स्वगावी परत येत असताना 23 एप्रिल ला दुपारी 3.15 वाजताचे दरम्यान गिरसावली व आशी रस्त्याचे मध्यंतरी मृतकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व अपघात घडला.सदर अपघातात मृतकाचा जागीच मृत्यू झाला.

मृतक घरी परत नसल्याने मृतकाचे वडील त्याला शोधण्यासाठी निघाले परंतु शोध लागला नाही, त्यानंतर 24 एप्रिलला सकाळी 8.00 वाजता मृतक रोडचे बाजूने एका खोल नालीत मृतावस्थेत पडून होता.

वरोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मात्र वसुलीची टक्के मृतकाजवल आढळून आली नसल्याचे समजते.त्यानंतर मृतकाचे विच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.मृतक राष्ट्रवादी पक्षाचे नेते ऍड.मोटेश्वरराव टेमुर्डे  यांचे नातेवाईक आहे.

मृतकाचे मागे आई,वडील,पत्नी,दोन बहिणी असा मोठा आप्तपरीवार आहे. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

Previous articleसावधान :-सीमावर्ती भागातील नागरिकांनो सतर्कता बाळगा, पोलिसांचे आव्हान !
Next articleसणसणीखेज :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात कोळसा माफिया सोबत पत्रकारांची होणार पोलिस चौकशी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here