Home भद्रावती तक्रार :-स्वतःच्या क्रुत्याची अश्लील चित्रफीत बनविनाऱ्या त्या डॉक्टरांची वेकोलि व पोलिस अधिक्षक...

तक्रार :-स्वतःच्या क्रुत्याची अश्लील चित्रफीत बनविनाऱ्या त्या डॉक्टरांची वेकोलि व पोलिस अधिक्षक यांचेकडे तक्रार !

आपले पाप लपविण्यासाठी पोल खोलणाऱ्याना गोवण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न ! मात्र मुख्य महाप्रबंधक यांनी दिले कारवाईचे संकेत ! त्या सर्व आरोपींना मिळाला जामीन.

माजरी प्रतिनिधी :-

स्वतःला गजानन महाराजांचा शिष्य समजणाऱ्या एका माजरी वेकोलि क्षेत्रातील डॉक्टरांचा प्रताप बघून तोंडात बोटे घालावी अशा प्रकारचे त्यांचे चारित्र्य समोर आल्याने आता गजानन महाराजांचे भक्त असेही असतात का ? यावर विचारमंथन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाप आपण करायचे आणि ते पाप उघड झाल्याने कायद्याच्या आडोशाने स्वतःला वाचविण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करणाऱ्या त्या डॉक्टरांच्या अश्लील चित्रफितीचे राज आता केवळ पोलिस तपासातच उघड होईल. दरम्यान डॉक्टरांना त्या चित्रफितीच्या माध्यमातून ब्लैकमेल करणाऱ्या सर्व आरोपींना भद्रावती न्यायालयात जामीन मिळाला असल्याची माहीती आहे. मात्र अशा चारित्र्यहीन डॉक्टर सारख्या लोकांमुळे सामाजिक आरोग्य मात्र बिघडविले जाते त्याचे काय ? हा प्रश्न सुद्धा त्या अर्थाने अत्यंत महत्वाचा आणि कळीचा बनला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे अशा सार्वजनिक ठिकाणी नौकरी करणाऱ्या चारित्र्यहीन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वेकोलि मुख्य महाप्रबंधक गुप्ता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शिवाय अशा डॉक्टरांवर स्वतःच आपल्या प्रेमिके सोबत अश्लील चित्रफीत काढणे आणि ती चित्रफीत आपल्याच प्रेमिकेला ब्लैकमेल करण्यासाठी म्हणून संग्रहित करणे हा सुद्धा एक गुन्हाच असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे पण निवेदन दिल्याने आता या प्रकरणात पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here