Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर शहरात एकाच कुटुंबातील ४ नागरिक पॉझिटीव्ह.

खळबळजनक :- चंद्रपूर शहरात एकाच कुटुंबातील ४ नागरिक पॉझिटीव्ह.

 

चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित कोरोना आजारातून झाले बरे आतापर्यतची बाधित संख्या ६२ जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १९

कोरोना अपडेट :-

चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे ३ नागरिक काल २३ जून रोजी बाधित आढळले होते. आज याच कुटुंबातील १९ वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ६२ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या अॅक्टिव्ह बाधितांची संख्या फक्त १९ असून आतापर्यंत ४३ नागरिक कोरोना आजारातून बरे झाले आहे.
हैदराबाद शहरातून १६ जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( ४० वर्षीय ) वडील ( ४७ वर्षीय ) व मुलगा ( २१ वर्षीय )बाधित असल्याचा अहवाल काल आला होता. आज मुलीचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मुलीचे स्वॅब नमुने २३ जून रोजी घेण्यात आले होते. २४ जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) आणि २४ जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ६२ झाले आहेत.आतापर्यत ४३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ६२ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १९ झाली आहे.

Previous articleबंदर कोळसा ब्लॉक लीलाव रद्द करण्याची पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचेकडे इको-प्रो ची मागणी.
Next articleसनसनिखेज:- पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गायी सह रमेश वेलादी हा गुराखी ठार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here