Home वरोरा शेतकरी सन्मान :-न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेचा अभिनव उपक्रम , कोरोना योद्धा शेतकरी...

शेतकरी सन्मान :-न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेचा अभिनव उपक्रम , कोरोना योद्धा शेतकरी यांचा सत्कार !

शेतातील बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे मानले आभार !

वरोरा प्रतिनिधी :-
कोविड १९ कोरोना च्या महामारी मध्ये पूर्ण देशभरात स्वतःची काळजी न करता आपल्या साठी लढणारा खरा योद्धा म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी असून त्यांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने सार्थक ठरू शकतो. त्यामूळे न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेतर्फे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शाल श्रीफळ व सत्कार चिन्ह गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. व शेतकरी हे आपल्या साठी योद्धा म्हणून उभे आहेत त्यासाठी त्यांचे आभार मानले, कारण ज्या कोरोना महामारी मध्ये संपूर्ण जग थांबले आहे त्या कठीण परिस्थितीत शेतकरी शेताच्या बांधावर राहून संपूर्ण जगाला अन्य पिकवित आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानायला हवे अशा भावना अभिजित कुडे यांनी व्यक्त करून शेतकऱ्यांचा समस्या जाऊन घेतल्या व त्यांची विचारपूस केली. याप्रसंगी न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेचे अभिजित कुडे , रोशन भोयर, विनोद कोठारे, तेजस उरकुडे , विजय कुडे, आझाद शेख, रणजित कुडे उपस्थित होते,

Previous articleकोरपना नगरपंचायतकडून व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई ।
Next articleचिंताजनक :- शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्या तहसीलदार गौडचे रेती माफियांना अभयदान ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here