Home चंद्रपूर धक्कादायक ;- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर ? तूकूम व...

धक्कादायक ;- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर ? तूकूम व मुल तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण !

आतापर्यंतची बाधित संख्या ९८. उपचार घेणारे कोरोना बाधित ४४. आतापर्यत ५४ कोरोनातून बरे. 

कोरोना अपडेट :- 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित रुग्ण पुनः   पुढे आल्याची धक्कादायक  माहिती समोर आली असून चंद्रपूर जिल्हा आता कोरोना बाधित रुग्णाच्या शतकांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील सुशी गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आला आहे. नवी दिल्ली वरून परत आलेल्या २८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
तर दुसरा ३० वर्षीय युवक तुकूम परिसरातील असून वाशिम येथून आला आहे. श्वसनाचा आजार जाणवत(आयएलआय ) असल्यामुळे हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता. दोन्ही बाधिताची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) आणि १ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ९८ झाले आहेत. आतापर्यत ५४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ९८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here