Home चंद्रपूर धक्कादायक :- वर्धा पॉवर कंपनीत वाळू बिरिया या कामगाराचा आकस्मिक मृत्यू, कामगारांच्या...

धक्कादायक :- वर्धा पॉवर कंपनीत वाळू बिरिया या कामगाराचा आकस्मिक मृत्यू, कामगारांच्या मृत्यूचे गूढ मात्र कायम !

मृतक कामगारांच्या नातेवाईकांना कंपनी कडून मिळाली आर्थिक मदत !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरातील सिद्धार्थ वार्ड मिलन चौक येथे राहणाऱ्या नरेश उर्फ बाळू लक्ष्मण बिरीया वय 52 वर्ष यां कामगारांचा वर्धा पॉवर प्लांट कंपनी मधे आकस्मिक मृत्यू झाला मात्र त्या कामगारांच्या मृत्यूचे कारण कंपनी व्यवस्थापन सांगण्यास असमर्थ ठरली असल्याने कामगारांच्या मृत्यूचे गूढ कायम असल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा पॉवर कंपनी मधे घडला असल्याची माहिती आहे.
कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? या प्रश्नाला
घेऊन त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शंका व्यक्त केली होती. कंपनी मृत्यू चे कारण सांगण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या परिवाराने मृत शरीराचे शवविच्छेदन करण्यास मनाई केली होती.कारण परिवाराचे कंपनी व्यवस्थापना विरोधात आरोप होते की अगोदर कंपनी वर गुन्हा दाखल करा मगच शवविच्छेदन होईल, त्यामूळे काही काळ गोंधळ उडाला होता. परंतु कंपनी कामगाराच्या मृत्यू ची चौकशी निश्चित होईल असे आश्वासन देवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृतकाच्या परिवाराला त्यांच्या मिळकतीचे राशी व्यतिरिक्त सहा लाख रुपये ,मुलाला नौकरी देण्याचे मान्य केल्यानंतर प्रकरण शांत झाले व शव विच्छेदन करण्यात आहे. या वेळी कंपनी चे व्यवस्थापक कुलकर्णी ,डी.जोशी,एन. दास जी गौरकर .ऍड. रोशन नाकवे, भारतीय सुदर्शन समाज के महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री राजेश रेवते , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, संजू बिरीया ,राजेंद्र मर्दाने विनोद बिरीया, आदी मध्यस्थ उपस्थित होते.

Previous articleसेवकाळातील अनुभवांचा नवोदित कामगारांना फायदा- खान प्रबंधक आर.के.आचार्य.
Next articleसुयश;- सेन्ट अॅनिस हायस्कूल येथील स्पंदन बोरकर या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here