Home भद्रावती संतापजनक :- प्रेमविरांचे संगमस्थान असणाऱ्या उदय लॉज संचालकांच्या उलट्या बोंबा.म्हणे बातमी देतांना...

संतापजनक :- प्रेमविरांचे संगमस्थान असणाऱ्या उदय लॉज संचालकांच्या उलट्या बोंबा.म्हणे बातमी देतांना विचारले का नाही ?

मग पोलिसांचा त्या लॉजवर वावर कसा ? व लफडी करणाऱ्या जोडप्याना प्रवेश कसा ? याचे उत्तर कोण देणार ?

भद्रावती :-
भद्रावती पोलीस हे अवैध धंदेवाईक यांना पाठीशी घालून माल सुतो अभियान राबवीत आहे कारण दारू किंग नागो व इतर दारू माफियांना अजून पर्यंत पोलिसांनी अभय दिला असून आताही नागो नागपुरे याचा एक माणूस ऑर्डर वर जागो जागी दारू पोहचवूण देत असल्याची माहिती आहे, मात्र त्याहून कहर म्हणजे खुलेआम भद्रावतीच्या मुख्य नागपूर चंद्रपूर रोडवर असलेल्या उदय लॉज मधे मुली आणि महिलांना घेवून काही आंबटशौकीन रासलीला करीत असताना सुद्धा पोलिसांची त्या उदय लॉजवर उपस्थिती ही अत्यंत शरमेची व लज्जास्पद बाब आहे. मात्र या परिस्थितीला जनतेसमोर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे आणल्यानंतर खुद्द या उदय लॉज संचालकांनी संपादकांना फोन करून मला अगोदर विचारले का ? मी तो लॉज किरायाने दिला आहे, माझा त्या लॉजशी काहीएक सबंध नाही त्यामुळे माझे स्पष्टीकरण छापा अन्यथा परिणाम वाईट होईल अशीही धमकी दिल्याने लॉज मधे खुलेआम प्रेमविरांच्या रासलीला सुरू असल्याच्या चर्चा भद्रावती शहरात सर्वत्र असताना लॉज मालकांना याची खबर नसावी म्हणजे नवलच आहे, नव्हे या चोरांच्या उलट्या बोंबाच असल्याची चर्चा आता सुज्ञ नागरिक करीत आहे.

या उदय लॉज मधील गैरप्रकार हा पोलिस प्रशासनाच्या खाकी वर्दीला लाजविनारा आणि कलंकित करणारा असून अवैध दारू विक्रेते नागो आणि अख्तर यांना पोलिस रंगेहाथ का पकडत नाही ? हा विषय चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे. या परिस्थितीची जाण असलेले व कुठल्याही परिस्थितीत यावर तातडीने मात करण्यासाठी जबाबदार असणारे ठाणेदार पवार हे गप्प का ? यावर आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here