Home भद्रावती दुःखद वार्ता :- भद्रावती येथील नृत्यकलाकार किरण गेडाम यांचा नाल्यात पडून दुर्दैवी...

दुःखद वार्ता :- भद्रावती येथील नृत्यकलाकार किरण गेडाम यांचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू .

विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देणारा उत्कृष्ट कलाकार हरवला !

भद्रावती-(तालुका प्रतिनिधी)

शहराच्या सुमठाणा वार्डातील रहिवासी आणि नृत्य कलाकार म्हणून प्रशीद्ध असलेल्या किरण गेडाम( वय 44) यांचा रविवारी रात्री नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता शहरात पसरताच सगळीकडे शोककळा पसरली.
किरण गेडाम हा भरतनाट्यम नृत्यप्रकारातील उत्कृष्ठ कलाकार होता. त्याने आपल्या नृत्यकलेने अनेकांना मोहिनी घातली होती. अनेक दिवस त्याने भद्रावती आणि आयुध निर्माणीतील विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले होते. मात्र त्याच्या जीवनात लॉक डाऊन च्या कालात झालेला बदल आणि काही दिवसांपासून त्याला दारूचे जडलेले व्यसन यामुळे तो पूर्णतः खचून गेल्याचे बोलल्या जात होते. तो दारूच्या नशेत असताना तो पुलावरून नाल्यात पडला असावा व त्यात त्याचे निधन झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी सकाळी 11:30 वाजताचे दरम्यान त्याचे प्रेत नाल्यात पडून असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले.त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी गेले व प्रेताचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी रुग्णलयात पाठविले. ही घटना चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील भद्रावती शहरातील MRF टायर शोरूम जवळ घडली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here